छत्रपती शिवाजी महाराजांच्या लामजना येथील पुतळ्यास
पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी केले विनम्र अभिवादन
लातूर प्रतिनिधी : मंगळवार दि. २९ मार्च २०२२ :
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख हे आपल्या नियोजित किल्लारी दौऱ्यासाठी जात असताना औसा तालुक्यातील लामजना येथे थांबून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून त्यांनी विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी लामजना पंचक्रोशीतील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नागरिकांनी पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके, सचिन दाताळ, प्रा. सुधीर पोतदार, दत्तात्रय आळणे, प्रवीण सूर्यवंशी, संजय लोंढे, रामेश्वर मोरे, सुग्रीव लोंढे, मुकेश बीदादा आदीसह लामजना पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.