औसा येथे राज्यस्तरीय उस्फूर्त भजन गायन स्पर्धा
औसा प्रतिनिधी
येथील माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने 12 व 13 मार्च 2022 रोजी मुक्तेश्वर मंदिरात राज्यस्तरीय उस्फूर्त भजन गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून खुला गट आणि बाल गट अशा दोन गटातून स्पर्धकांना रविवार दि. 12 मार्च पर्यंत नाव नोंदवता येईल.
खुला गट पाहिले बक्षीस 11 हजार, बाल गट 5 हजार आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी 1 हजार 100 रुपये असे एकूण गुणानुक्रमे दोन्ही गटातील आठ विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी चंद्रकांत मरपल्लीकर, श्रीमंत पांचाळ, अमोल महाराज, तुकाराम पांचाळ, केरबा बुलबुले, भास्कर शिंदे यांचे सौजन्य लाभले असून या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष पं. शिवरुद्र स्वामी, सचिव व्यंकटराव राऊतराव, कोषाध्यक्ष हणमंत लोकरे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.