शाॅर्ट सर्किटने हार्वेस्टरसह अडीच एक्कर ऊस जळून खाक.
औसा प्रतिनिधी विलास तपासे
- ऊस तोडणी करीत असलेल्या हार्वेस्टर मिशन मध्ये शाॅर्ट सर्किटने झाल्याने लागलेल्या आगीत हार्वेस्टरसह अडीच एक्कर ऊस जळून खाक झाल्याची घटना वांगजी (ता.औसा) शिवारात घडली असून सदरील घटनेची नोंद भादा पोलीसात करण्यात आली आहे.
दि. २७ मार्च रोजी वांगजी शिवारात हिप्परगा येथील शेतकरी रघुनाथ केशव भोजने यांच्या शेतातील अडीच एक्कर ऊस विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेकडून तोंडणी सुरू असताना दुपारी अडीच वाजता हार्वेस्टर मिशन मध्ये अचानक झालेल्या शाॅर्ट सर्किटने आग लागली. या आगीत हार्वेस्टरसह अडीच एक्कर ऊस अक्षरशा जळून खाक झाला.यावेळी सदरील हार्वेस्टर मिशन आॅपरेटर तुकाराम व्यंकट भारती यांनी प्रसंगावधान राखत ऊसाच्या फंडातून बाहेर निघाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत हार्वेस्टर मिशनचे सुमारे ८९ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी सदरील नुकसानीची माहिती हार्वेस्टर मालक हबीब महताब शेख यांनी भादा पोलीसात दिली असून या नुकसानचा पंचनामा भादा पोलीसांकडून करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.