दत्तात्रेय परिहार आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित
औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील चलबुर्गा येथील उपक्रमशील व प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय तुळशीराम परिहार यांना लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शेतकरी पुरस्कार 2019 20 सालाचा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे तसेच जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते महेश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला दत्तात्रय तुळशीराम परिहार यांनी आपल्या चलबुर्गा येथील शेतामध्ये कमी खर्चामध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करून ास्तीचे उत्पादन घेऊन ग्रामस्थ समोर व शेतकर्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केल्यामुळे लातूर जिल्हा परिषदेच्या आदर्श शेतकरी पुरस्कारांचे ते मानकरी ठरले त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल चलबुर्गा येथील सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्तीचे अध्यक्ष व सर्व शेतकरी बांधवांनी अभिनंदन केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.