महावितरणे सुचना न देता विज कनेक्शन तोडू नये तसेच विद्युत पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा त्वरित चालू करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

 महावितरणे सुचना न देता विज कनेक्शन तोडू नये तसेच विद्युत पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा त्वरित चालू करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी





औसा प्रतिनिधी

औसा तालुक्यातील जावळी येथील विद्युत पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा त्वरित चालू करा, तसेच महावितरणे सुचना न देता विज कनेक्शन तोडू नये या मागणीसाठी दिनांक 26 मार्च शनीवार रोजी मा.उपकार्यकारी अभियंता उपविभागीय कार्यालय किल्लारी, तसेच सहायक अभियंता शाखा कार्यालय लामजना येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सादर केले आहे.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे मौजे जावळी लामजना सप्लायर्स डेपो वरुन महावितरणे शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता दि.10 डिसेंबर 2021 रोजी विज कनेक्शन तोडले आहे.  परंतु अद्याप पर्यंत कनेक्शन जोडण्यात आलेले नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.जवळ जवळ 4 महिने शेतकऱ्यांचा विद्युत मोटारी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे,व शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तरी विद्युत पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा त्वरित चालू करण्यात यावा.अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल,याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण  राहील.असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश देवीदास माडजे यांनी दिला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रामेश्वर शेषेराव मुळे, सालार महेबुब पटेल, ज्ञानेश्वर बाबुराव चिल्ले, यशवंत ग्यानदेव भोसले,नारायण लक्ष्मण मुळे यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या