माळी समाजाचा 15 एप्रिल 2022 रोजी ३ रा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

 माळी समाजाचा 15 एप्रिल 2022 रोजी ३ रा राज्यस्त


रीय वधू-वर परिचय मेळावा




अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद लातूर आणि माळी सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने शुक्रवार, दि. 15 एप्रिल 2022 रोजी येथील दयानंद महाविद्यालय लातूर येथील सभागृहात माळी समाजाचा तिसरा राज्यस्तरीय वधू-वर परिचय आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पध्‍दतीने बायोडाटे (परिचयपत्र) https://forms.gle/DydmZWQ5VCLv3Zan9 गूगल फॉर्म (Google Forms ) भरून वधु-वरांची निःशुल्क नोंदणी करून घ्यावी असे अहवान माळी सेवा संघ महाराष्ट्र – औसा तालुका अध्‍यक्ष श्री. सचिन माळी यांनी केले आहे.

माळी समाजातील विवाहेच्छुकांना परिचयाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माळी सेवा संघ महाराष्ट्रच्या वतीने दरवर्षी माळी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय व पालक मेळावा आयोजित करण्यात येतो. या मेळाव्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. महाराष्‍ट्रातील सर्व जिल्‍हयातून या मेळाव्‍यासाठी वधू-वर यांची ऑनलाईन पध्‍दतीने नोंदंणी होत आहे. तरी सर्व समाज बांधव/वधु-वर पालक यांनी 15 एप्रील 2022 रोजी लातूर येथील दयानंद महाविद्यालयातील सभागृहात सकाळी 10.00 वाजेपर्यत हजर राहावे असे आवाहन माळी सेवा संघ महाराष्ट्र – औसा तालुका अध्‍यक्ष सचिन माळी, राजेंद्र वडगावे, संजय माळी, बालाजी माळी सर , पांडूरंग माळी, गजानन चांभरगे, फासे मँडम, किरण म्‍हेत्रे, चंद्रकांत गोरे, अनंत भोजणे, अनिल म्‍हेत्रे, महादेव माळी, विशाल फुटाणे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या