*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघणाऱ्या रॅली, मिरवणुकीच्या गर्दीमुळे शक्यतो समांतर मार्गाचा वापर करावा.
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त निघणाऱ्या मिरवणूक, रॅली मार्गावर दिनांक 13/04/2022 रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत गर्दीमुळे शक्यतो सर्व प्रकारच्या वाहनांनी छत्रपती शिवाजी चौक ते मिनी मार्केट डावी बाजू एकेरी वापरावी. तसेच मिनी मार्केट ते छत्रपती शिवाजी चौक एकेरी वाहतूक डाव्या बाजूने वापरावी.
तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता अतिरिक्त वाहतूक शाखेतील पोलिसांची नेमणूक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
लातूर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नियमांचे पालन करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.