तपसेचिंचोली येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन*

 *तपसेचिंचोली येथे भव्य खुल्या टेनिस बॉल  क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन*











लामजना :-  औसा तालुक्यातील तपसेचिंचोली येथे  नरसिंह क्रिकेट संघ आयोजित भव्य  खुल्या टेनिस बॉल डे नाईट गाव वाईझ क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन   मंगळवारी (दि 12) रोजी  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी किल्लारी पोलीस ठाण्याचे   पोलीस उपनिरीक्षक  सुनील गायकवाड  , महावितरणचे लामजना विभागाचे कनिष्ठ अभियंता मुजाहिद्द सिद्दीकी   ,तपसेचिंचोली गावचे सरपंच विश्वंभर सुरवसे ,उपसरपंच युवराज यादव ,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे,राजेश पाटील, नितीन कवठाळे,अविनाश देशमुख,महेश सगर ,शैलेश बाजुळगे,संजय लोंढे  ,भैरोबा यादव ,अमोल देशमुख ,सतीश स्वामी, बीबीशन गरड,नागेश लादे ,सचिन गरड,गणेश लादे,यांच्यासह तपसेचिंचोली परिसरातील  तरुण युवक ,क्रिकेटप्रेमी  मोठया संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी  प्रथम, द्वितीय, तृतीय  असे तीन पारितोषिक ठेवण्यात आले असून  प्रथम पारितोषिक  शिवशंकर पाटील 44444 रुपये,द्वितीय पारितोषिक  कै. करबसप्पा कलशेट्टी यांच्या स्मरणार्थ  33333 रुपये ,तृतीय पारितोषिक  22222 रुपये ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे व राजेश पाटील यांच्या  वतीने  ठेवण्यात आले आहेत.


या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी यशस्वीरित्या पार पडाव्या यासाठी नरसिंह क्रिकेट संघ तपसेचिंचोली  व   क्रिकेटपटू अविनाश देशमुख तसेच तपसेचिंचोली येथील क्रिकेटप्रेमी प्रयत्न करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या