आठ वर्षाच्या चिमुकलीने कडक उन्हातही ठेवला रमजानचा रोजा उपवास

 आठ वर्षाच्या चिमुकलीने कडक उन्हातही ठेवला रमजानचा रोजा उपवास ! 







औसा/ प्रतिनिधी : - इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून, औसा येथील अनम अब्दुलअली काझी या दुसरीत शिकणाऱ्या अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकलीने दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही तब्बल १४ तासांचा निर्जल्य पद्धतीचा रोजा (उपवास) ठेवल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.

विश्वनिर्मात्या अल्लाहप्रति कृतज्ञ बनण्याच्या प्रवासात हे त्याचे पहिले पाऊल असून, इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे त्याने सिद्ध केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. दि. ४ एप्रिलपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, दिव्य कुरआन १४४२ वर्षांपूर्वी याच महिन्यात अवतरीत झाल्याने मुस्लिम बांधव या महिन्यात रोजा(उपवास) ठेऊन अल्लाहप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात.

हे रोजे( उपवास) ठेवणे प्रत्येक मुस्लिम बांधवांवर अनिवार्य असले तरी लहान मुले, वृद्ध, रुग्ण, आणि प्रवाशांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र लहान मुलांना ईशपरायण आणि चारित्र्यसंपन्न चांगल्या संस्काराची शिक्षण  त्यांना बालवयापासूनच दिली जाते. या उद्देशाने रोजा(उपवास) ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. रमजान महिन्यातील उपवास हे ईशकृतज्ञ होण्यासाठी आवश्यक आणि संस्कारक्षम व चारित्र्यसंपन्न व्यक्ती होण्यासाठी प्रशिक्षणाचा भाग असल्याचे मानले जातात. जगाचा निर्माता अल्लाह प्रति आपल्या संवेदना व्यक्त करत, सध्याचे तापमान पाहता रखरखत्या उन्हात पाहटे ०४ : ४५ वाजेपासून सायंकाळी ०६ : ४५ वाजेपर्यंत अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एकही घोट न घेता दिवसभर उपाशी पोटी राहून त्यांनी अल्लाह प्रति आपली श्रद्धा व्यक्त करत आहेत. 

दरम्यान आईच्या व आजीच्या नकारानंतरही ३९ तापमान असलेल्या कडक उन्हाळ्यात  तब्बल १४ तासांच्या निर्जल्य पद्धतीचा रोजा(उपवास) ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक कौतुक करत आहेत. अनम अब्दुलअली काझी या मुलीने रोजा (उपवास) करून आपल्या जीवनाचा पहिला रोजा (उपवास) पुर्ण केल्याबद्दल काझी बिरादरान व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या