डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पाणपोईचे उद्घाटन
औसा प्रतिनिधी
भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त नगर परिषद पेन्शनर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आत्माराम हरीबा बनसोडे यांच्या पुढाकाराने औसा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी थंडगार पाण्याची पाणपोई आणि उपस्थित नागरिकांना अल्पोपहार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन औसा येथील तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले .विद्यमान कर्मचारीही अशा प्रकारची व्यवस्था करीत नाहीत परंतु सेवानिवृत्त कर्मचारी असूनही अशा सामाजिक बांधिलकी मानून उपक्रम राबविल्याबद्दल आत्माराम बनसोडे यांच्या कार्याचे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी कौतुक केले. मागील पाच वर्षापासून आत्माराम बनसोडे हा उपक्रम राबवितात .यावेळी नगरसेवक समीर डेंग, पत्रकार राम कांबळे, प्रा काशिनाथ सगरे, रमाकांत माळी, मुक्तार मणियार, करीम शेख, यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.