अंगणवाडी महिलाकडून भादा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 अंगणवाडी महिलाकडून भादा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी 





औसा-

तालुक्यातील भादा येथील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती अंगणवाडी क्रमांक 04 वरवडा रोड भादा येथे साजरी करण्यात आली.

 यावेळी सरिता आगलावे आणि दैवशाला कात्रे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार,नारळ फोडून पूजन करून सकाळी 11 वाजता जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी अंगणवाडी सेविका अर्चना उबाळे,कुसुम उबाळे,भागीरथी पाटील,शीला कोळी,सुषमा माळी आणि मदतनीस आशालता उबाळे,ज्योती कुंजीर,सुवर्णा माळी, महानंदा गायकवाड,मंगल गोरे,तसलीम खोजे या उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या