औश्यात महावीर जयंती उत्साहात साजरी
मिरवणूक -जन्मोत्सव सोहळा -महाप्रसाद वाटप
औसा प्रतिनिधी:- जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर आणि अहिंसेचे महान पुजारी भगवान महावीर यांची 2621 वी जन्म जयंती औसा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शहरातून सजविलेल्या रथा मधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये येथील जैन समाज बांधव महिला मोठ्या प्रमाणात सामील झाले. येथील दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर यांच्या मुर्तीस अभिषेक करण्यात येऊन जन्म सोहळा साजरा करण्यात आला. समाजाचे ज्येष्ठ श्रावक रमेश दुरुगकर, नितीन विभुते व सुरेश दुरुगकर यांनी ध्वजारोहण केले. गुलालाची उधळण करून ध्वजावंदना करण्यात आला. जैन पंडित पार्श्वनाथ कांबळे मुरुडकर यांनी यावेळी भगवान महावीर यांच्या चरित्रावर आपला प्रवचनातून प्रकाश टाकला, महावीर भगवान यांच्या शिकवणीचे सर्वांनी आचरण करावे असे सांगितले. महावीर जयंती निमित्त मंदिरात दिवसभर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच या वेळी मंदिरावर भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महावीर जयंती सोहळा साजरा करण्यासाठी सर्व धर्मीय समाज बांधवांनी सहकार्य केले. यावेळी जैन सभेचे तालुका अध्यक्ष रमेश दुरुगकर, राजेंद्र दूरुगकर, नितीन विभुते,नेमिनाथ विभूते, जगदीश विभूते, सुरेश दुरुगकर, रितेश दुरुगकर, कमलाकर दुरुगकर, धनेद्र दुरुगकर, रितेश दुरुगकर ,सुमित दुरुगकर,मनोज पाटील, विजू पाटील, अमोल कोचट्टा, आदित्य दुरुगकर प्रा.किरण दुरुगकर, बंडू कोद्रे, आकाश दुरुगकर, श्रीनाथ कासार, सुशीला बाई दुरुगकर ,रंजना विभुते, रसिका दुरुगकर ,सारिका दुरुगकर, कल्पना दुरुगकर, नंदा देवसाळे, हेमताई विभूते,स्मिता दुरुगकर, आदी जैन श्रावक यांची मोठी उपस्थिती होती. भगवान महावीर जयंती निमित्त गेल्यावर्षी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लस शीतकरणासाठी समाजाच्या वतीने शीतपेटी (फ्रीज) भेट दिले होते..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.