भुतमूगळी येथील महादेव यात्रेची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता
औसा प्रतिनिधी औसा विधानसभा मतदार संघातील भुतमूगळी या गावात प्राचीन काळातील हेमाडपंथी महादेव मंदीर पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध आहे या मंदिराच्या यात्रा उत्सवानिमित्त दिनांक 9 ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सप्ताह कालावधीमध्ये नित्य हरिपाठ काकडा भजन व कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक 14 एप्रिल रोजी औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिरात दर्शन घेऊन ग्रामस्थांचा या उपक्रमाचे कौतुक केले मंदिर समितीच्या वतीने भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती या यात्रा उत्सवाची आज दिनांक 15 एप्रिल रोजी महंत मुक्ताई नाथ महाराज खेर्डा यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच मधुकर गायकवाड उपसरपंच सतीश चव्हाण मंदिर समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण प्रमुख पुजारी संजय स्वामी माणिकराव सावंत नेताजी सावंत यांनी केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.