*चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
सोलापूर- फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळा सोलापूर या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. जे. बी बागवान होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ तुपसाखरे, राहुल वाघमारे, हाजी बशीर अहमद बागवान व भिम शक्ति तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मुख्याध्यापिका सौदागर गजाला यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती दिली. सुत्रसंचालन पटेल जेबा यांनी तर पटेल अशरफ यांनी आभार मानले .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.