दि.२6/०४/२०२२ रोजी जि.प.प्रा.शा. बेलकुंड येथे प्रवेशपात्र मुलांसाठी शाळापुर्व मेळाव्याचे* भव्य आयोजन करण्यात आले.
सदर मेळाव्यासाठी इयत्ता १ ली प्रवेशपात्र विदयार्थी आणि त्यांचे पालक, गावचे सरपंच विष्णू कोळी, उपसरपंच सचिन पवार, पोलीस पाटील व्यंकट साळुंके, शालेय समिती अध्यक्ष विलास तपासे, शालेय समिती सदस्य कैलास कांबळे, सरोजा साळुंके, गोविंद वाघमारे, अनंत शिंदे, रामकृष्ण निकते, मुख्याध्यापक किरण पाटील, अंगणवाडी ताई,आशाताई, गावातील शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संखेने ग्रामस्थही उपस्थित होते.
सर्वप्रथम गावातुन प्रवेशपात्र मुलांची ढोल-तशा बैलगाडी मध्ये 28 विद्यार्थी बसवून ग्रामपंचायत च्या समोर ग्रामपंचायत च्या वतीने सर्व मुलाना पुष्प देण्यात आले व सत्कार करण्यात आले.
सदर मेळाव्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने होवून मुलांचे पुष्पगुच्छ,फुगे,खेळणी देवून स्वागत करण्यात आले.प्रवेशपात्र बालकांच्या सर्वांगीण( भाषिक,बौध्दिक,शारीरिक,भावनिक,...) विकासाला पोषक ठरणारे विविध खेळ घेण्यात आले.
तसेच पालक/बालकांसाठीचे कार्ड व त्यावरील कृती घेण्यात आल्या. याच कार्यक्रमाअंतर्गत पुर्वनियोजीत कार्यक्रम जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले . सर्व उपस्थितांनी त्याना शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मु.अ. किरण पाटील यांनी केले तर उत्तम सूत्रसंचालन बिराजदार सर यांनी केले आभाराची सांगता बनकर सर यांनी केली.
या त्रिवेणी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.