हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा, 3 लाख 62 हजाराचा मुद्देमाल जप्त, 08 गुन्हे दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*


     *हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा, 3 लाख 62 हजाराचा मुद्देमाल जप्त, 08 गुन्हे दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*








लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

                   या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर जिल्ह्यात अवैधरीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी दिलेले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे ,अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन,उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण व वाढवणा हद्दीत आज दिनांक 28/05/2022 रोजी पहाटेच्या सुमारास अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे इसमांच्या हातभट्टी अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा,लातूरच्या पथकाने व पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण, पोलिसाने वाढवणा च्या पथकाने अचानक छापामारी केली. हातभट्टी तयार करण्याचे साहित्य व 8,225 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 3 लाख 63 हजार 500 रुपयाची  हातभट्टी दारू व हात भट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे 

             या कार्यवाहीत 

1) परशुराम नामदेव राठोड राहणार डोंगरशेळकी तांडा तालुका उदगीर.

2) राम काशिनाथ राठोड राहणार डोंगरशेळकी तांडा तालुका उदगीर.

3) देविदास रामधन राठोड राहणार डोंगरशेळकी तांडा तालुका उदगीर.

4) विजय सिताराम राठोड राहणार डोंगरशेळकी तांडा तालुका उदगीर.

5) दिलीप देवराव पवार राहणार डोंगरशेळकी तालुका उदगीर.

6) निकिता अनिल पवार राहणार डोंगरशेळकी तालुका उदगीर.

7) जालूबाई देवराव पवार राहणार डोंगरशेळकी तालुका उदगीर.

8) भासू विश्वनाथ राठोड राहणार डोंगरशेळकी तालुका उदगीर.

                 अशा एकूण 08 आरोपीवर पो.ठाणे उदगीर ग्रामीण व वाढवणा येथे


1) पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण, गुन्हा रजिस्टर नंबर 224/2022 कलम 65 (फ)महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949


2)पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण , गुन्हा रजिस्टर नंबर 225/2022 कलम 65 (फ)महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949


3)पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण , गुन्हा रजिस्टर नंबर 226/2022 कलम 65 (फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949


4) पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण , गुन्हा रजिस्टर नंबर 227/2022 कलम 65 (फ)महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949


5)पोलीस ठाणे वाढवणा, गुन्हा रजिस्टर नंबर  80/2022 कलम 65(फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949


6)पोलीस ठाणे वाढवणा, गुन्हा रजिस्टर नंबर 81/2022 कलम 65(फ)महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949


7) पोलीस ठाणे वाढवणा, गुन्हा रजिस्टर नंबर 82/2022 कलम 65(फ)महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949


8)पोलीस ठाणे वाढवणा, गुन्हा रजिस्टर नंबर 83/2022 कलम 65(फ)महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949.


             असे एकूण 08 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण व वाढवण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहेत.

              सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक  फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड , राम गवारे , राजाभाऊ मस्के , बंटी गायकवाड ,नवनाथ हसबे, सुधीर कोळसुरे , तुराब पठाण ,सिद्धेश्वर जाधव,  नकुल पाटील, प्रदीप चोपणे, पोलीस ठाणे वाढवणा येथील पोलीस अमलदार गौसउद्दीन शेख, माणिक कसबे, बाजाले, पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस अमलदार नाना शिंदे, राहुल गायकवाड, काशिनाथ बरुरे यांनी केली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या