हर्बल ड्रग्ज राष्ट्रीय पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली ---सहसंचालक उमेश नागदिवे यांचे प्रतिपादन
औसा प्रतिनिधी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगाव द्वारा संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी च्या माध्यमातून हर्बल ड्रग्ज पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी मोठी प्रेरणा मिळाली असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे सहसंचालक उमेश नागदिवे यांनी केले. संस्थेच्या वतीने आयोजित हर्बल राष्ट्रीय पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर श्री सत्यनारायण फार्मसी विभाग प्रमुख भारती विद्यापीठ पुणे , वैभव शिंदे ,श्रीमती रेश्मा कावळे ,सीएम जंगमे , शुभास मुक्ता ,संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे (जेवळे)यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी महाविद्यालयाचे स्विविनीयर 2022 चे द्वितीय आवृत्ती प्रकाशित करण्यात आली तसेच लातूर कॉलेज ऑफ फार्मसी ने पुढाकार घेऊन राष्ट्रीय स्तरावरील हर्बल ड्रग्ज ट्रक्स पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले.या उपक्रमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली असून मागील दोन वर्षापासून कोरोना मुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेत असताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु या संस्थेने लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा नवा पॅटर्न निर्माण करीत राष्ट्रीय स्तरावरील हर्बल पोस्टर प्रदर्शन भरवून साडेआठशे विद्यार्थ्यांना सहभागी केले. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी झाल्याने मला आनंद वाटतो असे उमेश नागदिवे यांनी म्हटले. विद्यार्थी आणि संस्थाचालक यांनी समन्वयाने शिक्षण घेत पारदर्शकता ठेवली पाहिजे तसेच. प्रामाणिकपणा आणि कौशल्यपूर्ण विविध उपक्रमातून शिक्षण घेणे हे गरजेचे आहे.शिक्षण देत असताना प्रत्येकाने स्वतःला न्यायाधीश समजून इतरांसाठी आपण वकील असल्याच्या भूमिकेत राहून काम करणे गरजेचे आहे असेही सांगून उमेश नागदिवे पुढे म्हणाले की. लातूर कॉलेज ऑफ फार्मसी ने लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा नवा पॅटर्न दाखवून दिला. या संस्थेच्या कामाबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आपल्या शैक्षणिक प्रगतीची उंची गाठावी असेही शेवटी त्यांनी स्पष्ट केले. या वेळी भारती विद्यापीठाचे फार्मसी विभागाचे प्रमुख डॉ सत्यनारायण ,शिवलिंग जेवळे ,वेताळेश्वर बावगे यांनी आपले विचार व्यक्त केले. हर्बल ड्रग्ज पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमात एकूण 850 विद्यार्थ्यांनी नावे नोंदविली असून 150 विद्यार्थी पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमात भाग घेणार आहेत. 20 विद्यार्थी या उपक्रमामध्ये आपले मत मांडणार असल्याचे यावेळी संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांनी सांगितले .दगडोजिराव देशमुख सभागृह मध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये लातूर कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थिनीने भरतनाट्यमचा अनोखा नृत्य आविष्कार दाखवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती तिडके यांनी केले तर प्राचार्य नंदकिशोर बावगे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा मुलगे ,प्रा संतोष मेतगे , ग्रंथपाल प्रा अदावळे बी डी, यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.