पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर
औसा प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समिती जवळगा (पोमादेवी)यांच्या वतीने दिनांक 31 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता हनुमान मंदिर जवळगा पोमादेवी येथे भव्य सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सर्वच रुग्णासाठी मोफत असून निरो सर्जन, हृदयरोग ,पोट विकाररोग, अस्थिरोग, मुळव्याध भगंदररोग, स्त्रीरोग शिबीराचे आयोजन केले असून यामध्ये लातूर येथील तज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत.सर्वरोग निदान शिबीर मध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी करून रुग्णावर मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये डॉ हनुमंत किणीकर, सुदर्शन गुंठे, पल्लवी खंदारे, प्रियंका राजेगावे, पाटील नितीन बरडे ,प्रमोद लोकरे, शुभम राजेगावे आणि अश्विनी कोळकर हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.तरी जवळगा व परिसरातील गरजू रुग्णांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सर्वरोग निदान शिबिराचे लाभ घ्यावा. असे आवाहन अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.