#उड़ान_फॉउंडेशन_च्या_वतीने_650 गरजूंना ईदच्या सामानाचे_वाटप_संपन्न
"एक ही सफ़ में खड़े हुवे महमूद ओ अयाज़
न कोई बंदा रहा न कोई बंदा नवाज़"
बार्शी, दी 1/05/22 रोजी रविवार ठीक 4 वा. जम-जम हॉल बार्शी येथे एक कौतुकास्पद कार्यक्रम सम्पन्न झाला ज्यात उडान फाउंडेशन च्या वतीने रमजान चे किट वाटप या कार्यक्रम मध्ये 650 गरजू, गरीब व विधवा स्त्रियांना गरजू लोकांना ईद उल-फ़ित्र चे उपयोगी साहित्य म्हणजेच किट शहर व ग्रामीण भागात वाटप करण्यात आले. ज्यात काजू, बदाम, चारुळे, विलयची, मनुके, शेवया, खजूर, तेल पाकीट, गूळ, डालडा देऊन अश्या प्रकारे हा कर्यक्रम संपन्न झाला.
श्रीमंत-गरीब, मालक-नोकर कसलाही भेद न पाळता खांद्याला खांदा लावून आनंदाने ईद साजरी करता यावी म्हणून. या कर्यक्रमाचे आयोजन मागील 7 वर्षा पासून होत आहे.
लाभार्त्यांची निवड गरजू, गरीब, विधवा, अपंग इ. पात्रतेच्या आधारे विभागाच्या सदस्य मार्फत निवड करून त्याना कुपन वितरित केले जाते त्यानंतर ऊपस्तित गरजुचे स्वागत केले नंतर सामानाचे किट देवून त्यांना निरोप दिला .
बार्शी येथील फाउंडेशन खूप चांगलं काम गेल्या 7 वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात करत आहे रमजान च्या महिन्यात हा कार्यक्रम यशस्वी रित्या घेतला जातो, त्या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब वंचित लोकांना अन्नधान्य आणि ईद साठी लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू रुपी मदत केली जाते खूप चांगल्या प्रकारचा हा उपक्रम असून येणारे पुढच्या काळात समाजा ला शक्य होईल तेवढी मदत व सहकार्य फाउंडेशन च्या वतीने करण्यात येईल
तसेच उड़ान फॉउंडेशन ने मागील काळात रक्तदान, माफक दरात रुग्नवाहिका, मागील वर्षी लॉकडाउन काळात 3500 किराना किट गरुजुना वाटप, लग्नकार्य व हॉस्पिटल साठी मदत, शिबिर, व्याख्यान इत्यादी अनेक उपक्रम यशस्वी रित्या राबविले आहेत.
"उडाण फौंडेशन".
अल्पावधीतच बार्शी शहर व तालुक्यात प्रसिद्ध झालेले किंबहूना लोकप्रिय झालेले नाव. आमच्या बार्शी शहरातील अगदी सामान्य कुटुंब, सामान्य परिस्थिती, कष्टकरी परिवाराची पार्श्वभूमी असताना सुद्धा उडाण फौंडेशनची मुलं आज सामाजिक कार्यांमध्ये इतरांपेक्षा दोन पावले पुढे गेलेली आहेत. आज जेथे कोठे सामाजिक मदतीची अपेक्षा असते तेथे आपसूकच उडाण फौंडेशनचे नाव सर्वप्रथम व हक्काने घेतले जाते. याची बरीचशी उदाहरणे आम्ही बार्शीकरांनी अनुभवली आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रिय असताना देखिल ही सर्व मंडळी समाजहिताच्या दृष्टीने जनकल्याणाचा वसा घेऊन एकत्रित येतात, फौंडेशनच्या आज वरच्या कोणत्याही सामाजिक कार्यक्रम असो किंवा अस्मितेच्या प्रश्नांवर उतावळेपण कधीच आढळून आलेला नाही. सामाजिक विषमतेवरही नेहमीच संयम व लोकशाहीवादी भूमिका घेतली गेलीय. गोर गरीब वंचित गरजू लोकांच्या जिंदगीत सुखाची हिरवळ, फुल न फुलाची पाकळी म्हणून उडाण फौंडेशनने केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे, आजच्या कार्यक्रमाला 4 वा सुरुवात झाली आणि 6 वा कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्वात शेवटी लाभार्थ्यांच्या चेऱ्यावरील समाधान व आनंद अगदी स्पष्ट दिसत होते ह्या अविस्मरणीय दृश्य पाहून कार्यक्रमचे सार्थक झाल्याचा वाटले ।
या कार्यक्रमास प्रमुख उपस्तिथि
मुफ़्ती शहेबाज़ुल कादरी नोमानी, जाणीव फाउंडेशन वसंत मामा हवालदार, राहुल काळे, मस्के, ऑड अविनाश जाधव, पत्रकार सचिन वायकुले, शोएब सय्यद, धनंजय जगदाळे, कदीर बागवान, सोनू भोसले आदि मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संघटनेचे सचिव जमिल खान व आभार प्रदर्शन शबीर वस्ताद यानी केले.
या उपक्रम चे प्रकल्प प्रमुख सल्लागार युनूस शेख यांनी अथक परिश्रम घेतले
उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख, इलियास शेख, कार्याध्यक्ष शकिल मुलाणी, खजिनदार शोएब काझी, कॉम्रेड अयूब शेख, मोहसीन पठाण,साजन शेख, मुन्ना बागवान, रॉनी सय्यद, मोहसिन मालिक, जमीर तांबोळी, रियाज बागवान, राजू शिकलकर, ऑड रियाज़ शेख, मोईन नाईकवाडी, इक्वाल शेख, इरफान बागवान, जिलानी शेख, मुज़म्मिल जावळेकर तौसिफ बागवान, वसिम मुलाणी, सादीक काझी, अल्ताफ शेख, इंजिनिअर एजाज शेख, जावेद शेख, अकील मुजावर आदीनी सहकार्य केले .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.