लातुर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैलदादा उटगे यांची दावत- ए-इफ्तार पार्टी संपन्न
औसा मुख्तार मणियार
पवित्र रमजान महिन्यातील उपवासाची सांगता होत असताना रमजान_ईद च्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 1 मे 2022 रविवार रोजी सायंकाळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैलदादा उटगे यांनी औसा येथे आयोजित केलेल्या दावत-ए-इफ्तार कार्यक्रमास पालक मंत्री अमितभैय्या देशमुख हे उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
महात्मा गांधी यांनी दिलेल्या सर्वधर्म समभावाच्या शिकवणीमुळे आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झालेली असून ती अधिक बळकट करण्यासाठी *विविध धर्मातील सणांच्या निमित्ताने आपण एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतो* आहोत,औसा येथे आयोजित या कार्यक्रमातून *सर्व जाती धर्मातील बंधुभाव वृद्धिंगत होईल असा विश्वास पालकमंत्री अमितभैय्या देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. या दावत-ए-इफ्तार पार्टीत औसा शहरासह जिल्हातील मोठ्या संख्याने सर्व समाज बांधव उपस्थीत होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.