रामनाथ विद्यालयाचे पर्यवेक्षक आवटे ए.आय. यांचा निरोप समारंभ*

 *रामनाथ विद्यालयाचे पर्यवेक्षक आवटे ए.आय. यांचा  निरोप समारंभ*




आलमला ः रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री आवटे ए.आय.यांच्या 31 वर्षाच्या शिक्षक व पर्यवेक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द केल्याबद्दल रामनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने व रामनाथ कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री आवटे ए.आय व सौ. शमीम आवटे त्यांचा 1 मे 2022 रोजी महाराष्ट्रदिनी यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे सचिव प्राध्यापक जी.एम. धाराशिवे हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त अँड. उमेश पाटील, प्रभाकर कापसे, मन्मथप्पा धाराशिवे, शिवाजी अंबुलगे,.नरेंद्र पाटील, कैलास कापसे, शिवशंकर धाराशिवे, विश्वेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रथम संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ ,भर आहेर व भेटवस्तू व कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ,भर आहेर व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करून निरोप देण्यात आला. याप्रसंगी आवटे ए.आय. यांच्या कार्याविषयी व त्यांनी केलेल्या रामनाथ विद्यालयातील विविध विज्ञानाच्या उपक्रमाविषयी मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले याप्रसंगी आवटे सर यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थे विषयी आदर भाव होता म्हणून मी येथे व्यवस्थित काम करू शकलो व त्याचे समाधान जीवनभर लाभले.  कर्मचाऱ्या प्रति त्यांनी ऋण व्यक्त केले या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे सचिव प्रभाकर कापसे ,अडवोकेट उमेश पाटील बसवराज धाराशिवे यांनी आवटे सरांच्या जीवन कार्याविषयी उल्लेखनीय गौरव केला तसेच अध्यक्ष समारोप करतेवेळी प्राध्यापक जी एम धाराशिवे हे सरांनी आवटे सरांना भावी आयुष्य निरोगी जावे म्हणून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य श्री मुळे एस के.,विश्वेश्वर शिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, प्राचार्या अनिता पाटील व गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक दांडगे बी.जी यांनी केले. सूत्रसंचालन श्री पाटील पी सी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री भास्कर सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी आवटे सरांचे स्नेही, विद्यार्थी ,प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या