अनिल गायकवाड यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार

 अनिल गायकवाड यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार 





औसा प्रतिनिधी लोकमान्य विद्यालय पानचिंचोली येथील उपक्रमशील शिक्षक अनिल गोरोबा गायकवाड हे नियत वयोमानानुसार दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी आपल्या दीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. आपल्या प्रदीर्घ सेवा काळात उत्कृष्ट ज्ञानदानाचे कार्य करीत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करून आनंददायी शिक्षण देणारे अनिल गायकवाड हे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. लोकमान्य विद्यालयाच्या शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. श्रीराम विद्यालय सारोळा येथील शिक्षक नेताजी सावंत यांनी सेवानिवृत्त शिक्षक अनिल गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करून सेवा निवृत्ती बद्दल त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या