स्थानिक गुन्हा शाखा, लातूरची कामगिरी, 03 गुन्हे उघडकीस,05 मोटरसायकल,03 मोबाईल असा एकूण 02 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 03 आरोपी अटक*

स्थानिक गुन्हा शाखा, लातूरची कामगिरी, 03 गुन्हे उघडकीस,05 मोटरसायकल,03 मोबाईल असा एकूण 02 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 03 आरोपी अटक*





लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

       या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.

             पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषता मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .


           त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 01/ 05/ 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, पोलीस ठाणे एम आय डी सी येथे दाखल असलेल्या मोटारसायकल घेऊन बाभळगाव चौकात उभा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ बाबळगाव चौकात पोचून रोडवर मोटरसायकल सह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव 

1) सुशांत शिवाजी गायकवाड, वय 23वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी लातूर असे असल्याचे सांगितले.

                 तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटार सायकल संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटार सायकल काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातील व पाखरसांगवी परिसरातून चोरी केल्याचे सांगून त्याच्या आणखीन साथीदारांसह लातूर शहरातील विविध ठिकाणाहून आणखीन मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले.त्यावरून गुन्ह्यातील नमूद आरोपीचे साथीदार नामे


1) महादेव दिलीप समुखराव, वय 20 वर्ष, राहणार राजीवनगर बाभळगाव रोड लातूर 

2)कृष्णा गुंडेराव लोंढे, वय 19 वर्ष, 

राहणार म्हाडा कॉलनी, लातूर 


              यांना अतिशय शिताफीने तात्काळ ताब्यात घेऊन त्यांनी लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करून पोलीस ताब्यातील तिन आरोपीकडून चोरीच्या पाच मोटारसायकली, चोरीचे तीन मोबाईल असा एकूण 02 लाख 72 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मोटार सायकल चोरी चे तीन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.


             सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार संजू भोसले, पोलीस अंमलदार राम गवारे, कोडसुरे, सिद्धेश्वर जाधव , नाना भोंग , केंद्रे यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या