औसा शहरातील राशन कार्ड धारक व निराधार योजनेतील लाभार्थ्यांची समस्या दूर करा: डॉ अफसर शेख
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील राशन कार्ड धारक व निराधार योजनेतील लाभार्थ्यांची समस्या दूर करा या मागणीसाठी दिनांक 10 मे 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी औसा तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे राशन कार्ड व त्यावरील मिळणारे धान्य हे गरीब लाभार्थ्यांसाठी जीवनावश्यक बाब आहे. औसा शहरातील रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना दुकानदाराकडून वेळेवर धान्य पुरवठा होत नाही .तसेच शासनाकडून मिळणारे मोफत धान्य देण्यास दुकानदार टाळाटाळ करून कार्डधारकांना अरेरावीची भाषा करतात. यामुळे वयोवृद्ध रेशनकार्डधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रेशन कार्ड वरील युनिट प्रमाणे कार्डधारकांना धान्य पुरवठा दुकानदाराकडून होत नाही ते युनिट प्रमाणे देण्याबाबत आदेशित करावे. तसेच निराधार योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. तसेच प्रत्येक वर्षी 21 हजार रुपयांचे उत्पन्न अट करण्यात आलेली आहे .परंतु संबंधित अधिकारी 21 हजार रुपयाचा उत्पन्नाचा दाखला देत नाही .वयाचा दाखला हा वैद्यकीय अधिका-यांचा ग्राह्य धरण्यात येत नाही तरी याबाबत योग्य ते उपाय योजना करण्यात यावा. या मागणीचे निवेदन औसा तहसीलदार यांना सादर केले आहे.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत,माजी नगराध्यक्ष जावेद शेख,माजी पाणीपुरवठा सभापती गोंवीद जाधव,माजी नगराध्यक्ष मेहराज शेख,संताजी औटी, अँड वकील इनामदार,म. युनुस चौधरी, विनायक सुर्यवंशी आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.