औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना विविध मागणीचे निवेदन. डॉ अफसर शेख
औसा मुख्तार मणियार
औसा नगरपालिकेच्या विस्कळीत प्रशासन व्यवस्था व नागरिकांना होणारा त्रास दूर करा अशा विविध मागण्याचे निवेदन माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सत्तेचा कार्यकाळ संपल्यानंतर नगरपालिकेने नागरिकाच्या मूलभूत सोयी सुविधा मध्ये अक्षम्य दुर्लक्ष होत आहे त्यामुळे जनतेचे हाल होत असून नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्व परिस्थिती ही सकारात्मक असताना केवळ नियोजना अभाव व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेस हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. औसा शहरात 15 ते 20 दिवस आड होत असलेला विस्कळीत पाणीपुरवठा त्वरित नियमित करावा, बंद असलेल्या घंटागाड्या दुरुस्ती करून स्वच्छता कामास गती द्यावी, गटारी काढण्यासाठी प्राधान्य द्यावे, पावसाळ्यापूर्वी मोठी गटारी हाशमी चौक ते हनुमान मंदिर दोन्ही बाजूंनी गटार साफ करून घ्यावी, शहरातील मुख्य रस्त्यावरील डिवायडर मधील झाडे शहरातील उद्यानातील झाडे पाण्याअभावी वाढत आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था करावी, घरकुल योजना मधील उर्वरित फायली मंजूर करून निकाली काढाव्यात व उर्वरित हप्ता द्यावा, नवीन बोरवेल ला विद्युत कनेक्शन देऊन बोअर कार्यान्वित करावे, या विविध मागण्यासाठी दिं. 10 मे 2022 मंगळवार रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी नगराध्यक्ष जावेद शेख , माजी पाणीपुरवठा सभापती गोंवीद जाधव, माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, वकील इनामदार,माजी स्वीकृत सदस्य विनायक सुर्यवंशी आदिंची निवेदन देताना उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.