उन्हाच्या काहीलीत पक्षांना पाण्याच्या कुंड्या देण्यासाठी महेबूब चाचा धावले शासकीय मुलांच्या आयटीआयमध्ये

 

उन्हाच्या काहीलीत पक्षांना पाण्याच्या कुंड्या देण्यासाठी
महेबूब चाचा धावले शासकीय मुलांच्या आयटीआयमध्ये..







लातूर,दि.१२ःयंदाचे वाढलेले प्रचंड ऊन..त्यामुळे इथले चराचर हैराण आहे.त्यांना नेहमीपेक्षा अधिक चारा-पाण्याची गरज आहे..त्यासाठी धडपडणारे पक्षीमित्र महेबूब चाचा यांनी आज गुरुवार,दि.१२ मे २०२२ रोजी थेट मुलांचे शासकीय आयटीआय मध्ये पाण्याच्या कुंड्याच घेवून पोहोचले आणि त्या आयटीआय आवारातील झाडांवर बांधून देत प्राचार्या मनिषा बोरुळकर यांच्या हस्ते त्यामध्ये पाणी टाकून देवून त्याचा शुभांरभ केला.
वाढत्या उन्हाळ्यात पक्षांना चारा-पाण्याची नितांत गरज भासत आहे,ती भागविण्यासाठी आपल्या परीने पक्षीमित्र महेबूब चाचा अहोरात्र धडपडत आहेत,गेली दोन-तीन महिन्यात त्यांनी अनेक शासकीय कार्यालय परिसरात विनामूल्य मातीच्या पाण्याच्या कुंड्या बांधून देवून त्यात पाणी टाकण्याचे ते आवाहन करत आहेत.विशेष म्हणजे त्यांचा सहचारिणी मेहरुनिस्साचे गतवर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे,त्यापोटी आलेल्या ५० हजार शासकीय अनुदानाचा ते मोठ्या मनाने पक्षांच्याचारा पाणी,वृक्षलागवडीसाठी उदार मनाने खर्च करत आहेत,आज गुरुवार,दि.१२ मे २०२२ रोजी भरदुपारी ते शिवाजी चौकातील शासकीय मुलांचे आयटीआयमध्ये आपल्या मालवाहू टेम्पोत १० मातीच्या कुंड्या घेवून दाखल झाले.तेव्हा प्राचार्य मनिषा बोरुळकर यंानी त्यांचे शाल,पुष्पहाराने स्वागत करुन,जगावेगळ्या पक्षीप्रेमाचे कौतुक केले.चाचांनी या कुंड्या लागलीच झाडांवर बांधून घेतल्या.त्यात प्राचार्या बोरुळकर यांच्या हस्ते पाणी टाकून त्या पक्षांना अर्पण केल्या.
याप्रसंगी पत्रकार बाळ होळीकर, गटनिदेशक वसंत ठेले,सुनील जाधव, दिलीप जगदाळे, राजकुमार धनशेट्टी,निदेशक नरवाडकर,भांडारपाल प्रभू पवार, कर्मचारी बंडाप्पा बिडवे,नंदुबाई पखाले, बरदाळे, हसीना शेख आदी उपस्थित होते.
...................................................................................................
चक्रव्युह काव्यसंग्रह समाजासाठी दिशादर्शकःविलास सिंदगीकर यांचे मत
लातूर,दि.११ः साहित्याने समाजाचे दिशादर्शन करणे अभिप्रेत असून, कवी रमेश हणमंते यांचा आज प्रकाशित झालेला चक्रव्युह हा काव्यसंग्रह त्याच पटडीतला,सामाजिक आशय असलेला असल्याचे,निरीक्षण पाचवे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विलास सिंदगीकर यांनी नोंदविले.
अण्णाभाऊ साठे परिषदेच्यावतीने येथील दयानंद शिक्षण संस्था सभागृहात आयोजित पाचवे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन नुकतेच पार पडले, यावेळी कवी रमेश हणमंते यांच्या दुसर्‍या चक्रव्युह या दुसर्‍या काव्यसंग्रहाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते झाले,त्यावेळी सिंदगीकर बोलत होते.
यावेळी बीसेङ्गचे राज्याध्यक्ष प्रा.संजयकुमार मांजरमकर, प्रा.डॉ. शरद गायकवाड, प्राचार्य डॉ.माधव गादेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुधाताई कांबळे, अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे महासचिव प्रा.रामकिशन समुखराव,जि.प.चे माजी समाज कल्याण सभापती ऍड.टी.एन.कांबळे,मधुमती हणमंते, आष्टमी कांबळे आदिंची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या