जमाते इस्लामी हिंद व संभाजी ब्रिगेडची अशी ही माणुसकी.
सोलापूर (प्रतिनिधी) नीलम नगर भागातील साने गुरुजी प्राथमिक शाळेमध्ये जमाते इस्लामी हिंद यांच्या वतीने व संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने वृद्ध दांपत्य मोरे कुटुंबीयांना निवारा बांधून त्यांना घराची चावी प्रदान करण्याच्या कार्यक्रम थोर साहित्यिक डॉ. रफिक सय्यद यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ईद मिलन चा कार्यक्रम घेऊन शिरखुर्मा चे वाटप करण्यात आले.
यावेळी जाती धर्माच्या भिंती ओलांडून माणूसकीची भिंती जमात ए इस्लाम हिंद आणि संभाजी ब्रिगेड बांधत आहे. यात प्रत्येकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ रफीक सय्यद यांनी केले.
निवारा हि मानवाची मूलभूत गरज आहे आज कुटुंब एकत्र राहत नाहीत. शेजारी कोण राहतो याची माहिती नसते. समाजात अशी अनास्था निर्माण झाली आहे. मानव शिक्षित झाला पण संस्कारित नाही झाला. समाजात संस्कार घडविण्याच काम काही संघटना करत आहेत यात संभाजी ब्रिगेड आणि जमात ए इस्लाम हिंद सारख्या संस्था अग्रभागी आहेत. या मुळेच सामाजिक सलोखा टिकून आहे. असं मत जमात ए इस्लाम हिंद चे साहित्यिक डाॅ. रफीक सय्यद यांनी व्यक्त केले.
आकाशवाणी परिसरातील श्रीशैल नगर मध्ये नागनाथ मोरे हे वृध्द दांपत्य राहतात
तीन मुलं तारुण्यातच अकाली देवाघरी गेले. एक मुलगी ती ही प्रसूती च्या वेळी दगावली मुलीच्या अनाथ दोन नातीसह एका नाल्याच्या कडेला मातीच्या जुन्या पुराण्या घरात राहत होते, एके रात्री कमकुवत भिंती ढासळत्या. मग उघड्यावर एका झाडाखाली आपलं संसार चालवत होते. संधीवाताने पत्नीस उठता बसता ही येत नाही. आजूबाजूंच्या घरात मिळेल ते आणून आपले पोट भरत. आठराविश्व दारिद्रय नागनाथ हे सत्तरी पार केलेले पत्नीसह नातींसाठी धडपडत आहेत. ही बाब संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शाम कदम यांच्या निदर्शनास आली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सर्व कुटुंबीयांना नवीन कपडे मिठाई व अन्नधान्य जमात ए इस्लाम हिंद चे पदाधिकारी शफीक काझी व करीम शेख यांच्या हस्ते भेट दिले. नागनाथ मोरे कुटुंबाची हेळसांड काझी यांच्या लक्षात आले आणि त्यांना पक्क निवारा उभं करून घराची चावी डॉ रफीक सय्यद यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड जमात ए इस्लाम हिंद शफीक काजी़
करीम शेख संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती
या प्रसंगी संभाजी ब्रिगेड चे सिताराम बाबर अरविंद शेळके रमेश जाधव दत्ता जाधव नागेश पवार सत्तार शेख रशिद शेख तलत शेख
सिराज इमाम हारून रशीद अ.मजीद शेख
सफवान बागवान सुनील राऊत मुश्ताक शेख
खरटमल शेठजी उपस्थित होते.
धर्मा धर्मात तर कधी समाजा समाजात तेढ निर्माण करुन एकोपा नष्ट करणाऱ्या समाजात निराधार मागासवर्गातील वृध्द दांपत्यांची करुण कहाणी मराठा युवकांच्या ध्यानी आले, मग पुढाकार घेऊन मुस्लिम बांधवांच्या सहकार्यानी कपडे, धान्य, नित्तोपयोगी वस्तू आणि निवाऱ्याची सोय करून दिली. हीच खरी माणुसकीची ओळख आहे. हे एक जातीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण असून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणार्यांना हि चपराक आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.