*लातूर शहरातील चार्ली पोलीस पेट्रोलिंगच्या धर्तीवर उदगीर नंतर आता निलंगा शहरातही चार्ली पोलीस कार्यान्वित. 01 मोटारसायक व 01 अधिकारी, 06 पोलीस अंमलदारांची ची नेमणूक*
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, काही महिन्यापूर्वी लातूर व उदगीर शहरात चार्ली मोटारसायकल पेट्रोलिंग कार्यान्वित करण्यात आली होती. त्याचे फायदे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे संकल्पनेतून आता निलंगा शहरातही एक मोटरसायकल 24 तास पेट्रोलिंगसाठी कार्यान्वित करण्यात आली असून त्या मोटरसायकलवर आळीपाळीने ड्युटी करिता सहा पोलीस अंमलदार व इन्चार्ज म्हणून पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. चार्ली पोलीस पेट्रोलिंग मोटरसायकलवर पेट्रोलिंग करिता नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे पुढील प्रमाणे
1) पोलीस उपनिरीक्षक- प्रताप गर्जे
2) पोलीस अंमलदार - डी बी शिंदे
3) पोलीस अंमलदार- ईश्वर जाधव
4)पोलीस अंमलदार- बाबासाहेब जगताप
5) पोलीस अंमलदार- गुंडेराव सूर्यवंशी
6)पोलीस अंमलदार- विनोद हेंबाडे
7) पोलीस अंमलदार- गुरुनाथ सूर्यवंशी
यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
सदर चार्ली पेट्रोलिंगद्वारे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना, महिलांना,लहान बालकांना व वयोवृद्धांना त्वरित मदत मिळणार असून ट्राफिक जाम,भांडण तक्रारी व काही अनुचित घटना घडत असताना डायल 112 वर कळविल्यावर लगेचच चार्ली पोलीस पेट्रोलिंगची मोटर सायकल सदर ठिकाणी पोहोचणार आहे.अडचणीत सापडलेल्या निलंगा शहरातील व शहरालगत सात किलोमीटर परिसरातील लोकांनी डायल 112 वर कॉल करून मदत मागितल्यास चार्ली पोलीस पेट्रोलिंग वरील पोलीस अंमलदार तात्काळ सदर ठिकाणी पोहोचणार आहेत त्यामुळे निलंगा वासियांना पोलीस मदत पाहिजे असल्यास त्यांनी त्यांचे मोबाईल मध्ये 112 असे टाईप करून कॉल केल्यास त्यांना तात्काळ चार्ली पोलीस पेट्रोलिंग कडून मदत पुरविण्यात येणार आहे तसेच कोणी जर खोडसाळ पद्धतीने किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने डायल 112 चा गैर उपयोग केल्यास त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक वेळीच पोलीस मदत मिळविण्याकरिता डायल 112 चा वापर करावा .
तसेच सदरच्या चार्ली पेट्रोलिंग वरील पोलीस अमलदार यांच्याकडे स्वयंचलित शस्त्र व वायरलेस वाकीटॉकी राहणार असून त्याद्वारे चार्ली पेट्रोलिंग ड्युटीवरील पोलीस आपसात कम्युनिकेशन करू शकणार आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.