आपण पाहत आहोत रिपोर्टर न्यूज़ आज ची बातमी वरिष्ठ पत्रकार मुख़्तार मणियार यांच्या कडून औसा तालुक्यातील नागारसोगा येथे मनरेगातुन ग्रामसमृद्धि कार्यशाळा संपन्न औसा तालुक्यातून राज्याला नवी दिशा दिली अप्पर सचिव नंदकुमार जी यांचे प्रतिपादन
औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून मतदार संघातील शेतकर्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न हा शेत रस्ते, शिव रस्ते आणि पानंद रस्ते हा असून शेतकऱ्यांच्या शेतमालाची ने-आण करण्यासाठी आणि पशुधनाचा येण्या-जाण्यासाठी रस्त्या शिवाय मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत होते. आमदार अभिमन्यू पवार यांनी आपला आमदार निधी शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यासाठी समर्पित केल्यामुळे हजारो किलोमीटरचे मतदारसंघातील रस्ते तयार झाले. मनरेगाच्या माध्यमातून औसा मतदार संघातील कामाने राज्याला दिशा दिली असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अवर सचिव नंदकुमार जी यांनी केले. नागरसोगा तालुका औसा येथे दिनांक 20 मे शुक्रवार रोजी आयोजित मनरेगा तुन ग्राम समृद्धी कडे या कार्यशाळेच्या प्रसंगी अवर सचिव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विक्रीकर उपायुक्त श्रीकांत लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, सुहास पाचपुते आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना नंदकुमार जी म्हणाले की आता शासकीय कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र एक करून काम करणे आवश्यक असून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेती रस्त्याच्या अडचणी सोडविणे आवश्यक आहे. मनरेगाच्या माध्यमातून औसा तालुक्यामध्ये झालेल्या कामाचे त्यांनी कौतुक करीत औसा मतदार संघातील कामाने महाराष्ट्र राज्याला एक दिशा दाखवून वेगळ्या वळणावर आणले आहे. येणाऱ्या काळात चांगल्या कामासाठी काम करणार यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जाणार नाहीत. त्यासाठी प्रत्येकाने निर्मळ मनाने जनसेवेचे व्रत समजून काम करावे असेही शेवटी त्यांनी आवाहन केले. यावेळी बोलताना प्रधान कृषी सचिव एकनाथ ढवळे म्हणाले की सध्या खरीप हंगाम दिवस जवळ आले असून शेतकऱ्यांनी सोयाबीन सह इतर सर्व पिकाची बीज प्रक्रिया करून आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे आणि पूरक उद्योग सोबत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून शेततळे सिंचन विहिरी रस्ते आणि शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी गोठा अशा विविध योजनांचा लाभ घेऊन आपली कौटुंबिक प्रगती करावी असे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी श्री इंगळे लिखित माझे गाव मी समृद्ध या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये मनरेगाच्या योजना राबविण्यासाठी अनेकांचे हात राबले असल्याने या कार्यशाळेमध्ये निलंगा व औसा येथील तहसीलदार गट विकास अधिकारी भुमी अभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकारी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्यासह गावात उत्कृष्ट योजना राबविणाऱ्या सरपंचांचा ही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी औसा मतदार संघातील हजारो शेतकरी व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सरपंच सौ सरोजा सूर्यवंशी आणि उपसरपंच बंडू मसलकर यांनीही मान्यवरांचे नागरसोगा गावात आगमन झाल्याबद्दल स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे सदस्य दीपक चाबुकस्वार यांनी केले.
चालू घड़ामोड़ी व आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र रिपोर्टर या न्युज़ चॅनलला सब्सक्राइब करा आमच्या वेब www.maharashtrareporter.in वऱ हि बातम्या पाहु शकता
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.