औसा शहरासह तालुक्यात अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
औसा प्रतिनिधी
राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्यी जयंतीनिमित्त औसा शहर व तालुक्यात अहिल्या भक्तांनी मोठ्या उत्साहात मध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन लोक मातेला अभिवादन केले .औसा येथे अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृह समोर आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव कल्पनाताई डांगे, माजी नगरसेवक ॲड मंजुषा हजारे, शिवसेना शहर प्रमुख सुरेश भुरे, माजी नगरसेवक बंडू कोद्रे, आणि गोपाळ धानोरे, शिवशक्ती संघटनेचे दादा कोपरे, चंद्रशेखर कत्ते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील उटगे, आणि प्रा भीमाशंकर राचट्टे आदी मान्यवर उपस्थित होते .तालुक्यातील जवळगाव पोमादेवी येथे सह्याद्री हॉस्पिटल च्या डॉक्टर समूहांच्या सहकार्याने सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरांमध्ये एकूण 258 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार डॉक्टर हनुमंत किणीकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आले. किल्लारी येथे बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव यांच्या हस्ते अहिल्या भक्तांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले, तालुक्यातील हासेगाव आशिव अपचुंदा दादा मंगरूळ मातोळा आधी गावा मध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. औसा शहरातील युवकांनी मोटारसायकल रॅली काढून भव्य शोभा यात्रे द्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये औसा शहरातील धनगर बांधवानी पारंपारीक धनगरी ढोल नृत्य करून उपस्थितांचे लक्ष वेधले. तर मागील एक महिन्यापासून लहान विद्यार्थी व विद्यार्थिनी सराव करून विविध गीतांच्या तालावर उत्कृष्ट नृत्याविष्कार करून लोक मातेला अभिवादन केले. औसा शहरात पारंपारिक पद्धतीने ही मिरवणूक अत्यंत उत्साह मध्ये संपन्न झाली. यावेळी जयंती समितीच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये 149 वी रॅक मिळवणा-या शुभम भोसले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
जयंती समितीचे पदाधिकारी व होळकर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जयंती सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.