खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस ताब्यात घेत असताना पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून ,पिस्टल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीवर पोलिसाच्या गोळीबार

खुनाच्या  गुन्ह्यातील फरार आरोपीस ताब्यात घेत असताना पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून ,पिस्टल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीवर पोलिसाच्या गोळीबार*:::



            याबाबत थोडक्यात हकिकत अशी ,पोलीस ठाणे चाकूर येथे अनोळखी व्यक्तीचे मृत शरीर मिळाल्याने पोलीस ठाणे चाकूर येथे आकस्मात मृत्यू दाखल होता.

              दिनांक 24/03/2022 रोजी पोलीस उपनिरीक्षक श्री. तुकाराम फड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/ 2022 कलम 302 भा द वि प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

          सदर गुन्ह्याचे तपासात अनोळखी मयत हा सचिन उर्फ लालू शिवसांब दावणगावे, वय 26 वर्षे, राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर. हा असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्ह्याचे अधिक तपास करीत असताना मयता सोबत जागेचे वाद असल्याचे कारणावरून नारायण तुकाराम  इरबतनवाड, राहणार शिरूर ताजबंद याने सदर गुन्ह्यातील मयताचा इतरांच्या सहाय्याने खून केल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यासाठी शोध पथक तयार करण्यात आले होते. सदरच्या शोध पथकाने नमूद आरोपीस गुन्ह्याच्या संदर्भाने अधिक चौकशी करण्यासाठी पोलीस ठाणे चाकूर येथे आणले होते.

         


    सदर आरोपीकडे गुन्ह्याच्या संदर्भाने चौकशी करीत असताना दिनांक 24/ 03/ 2022 रोजी पहाटे 05.00 ते 05.30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. त्यावरून सदर आरोपी विरोधात पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 99/ 2022 कलम 224 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

           नमूद फरार आरोपीचा शोध घेणे करिता वरिष्ठांचे मार्गदर्शनात  पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच सायबर शाखेचे विविध पथके यार करण्यात आले होते. आरोपीच्या शोध घेण्यासाठी सदर पथकांनी चंदिगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाना, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, मिरज, सोलापूर जिल्ह्यात जाऊन तपास व शोध घेतला परंतु तो सतत ठिकाणे बदलत असल्याने मिळून येत नव्हता. तरी पण शोध पथक त्याचा कसून शोध घेत होते.

               दिनांक 01/06/2022 रोजी शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, श्रीनगर लातूर येथील एका भाड्याच्या घरामध्ये सदरचा आरोपी लपून बसलेला आहे.अशी माहिती मिळाल्याने शोध पथकातील पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते, पोलीस अमलदार महेश चव्हाण, मस्के असे सदर ठिकाणी पोहोचून आरोपीस ताब्यात घेत असताना तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. शोध पथकाने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केले असता त्याने अचानकपणे शोध पथकातील पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते यांच्यावर हल्ला करून दोन्ही हाताने त्यांचा गळा दाबून तसेच गुप्तांगावर मारून त्यांच्याजवळील पिस्टल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वसंरक्षणात पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांनी एक गोळी फायर केली. त्यात नारायण इरबतनवाड हा जखमी झाला. त्यास ताबडतोब उपचार कामी शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते व नमूद गुन्ह्यातील आरोपी नारायण इरबतनवाड याच्यावर उपचार चालू आहेत.

                नमूद आरोपी विरोधात यापूर्वी पोलीस ठाणे अहमदपूर येथे भादवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल असून महाराष्ट्र राज्यातील बीड, अहमदनगर, खामगाव, बुलढाणा येथे एनडीपीएस एक्ट नुसार गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

             गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले हे करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या