*तक्रार देताच झोपी गेलेले प्रशासन झाले जागी*
*दंडाची रक्कम न भरणाऱ्या वर गुन्हा दाखल*
*अभय देणाऱ्या तहसीलदार वर केव्हा होणार कारवाई!*
*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या संघर्षाला यश*
निलंगा प्रतिनिधी: निलंगा तालुक्यात अवैधरित्या वाळू उत्खनबाबत अनेक गैरकारभार आहेत पदाचा दुरुपयोग करून अवैध वाळू माफियाला पाठीशी घालुण तहसीलदार गणेश जाधव हे लिलावाची 70 हजार रक्कम रियाज यांच्याकडून वसूल करीत नसल्याने यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे तक्रारव्दारे मागणी केली होती त्या तक्रारीची दखल घेऊन निलंगा पोलीस स्टेशन येथे वाळूची परस्पर विल्हेवाट प्रकरणी रियाज खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले.
निलंगा येथील इनाम जमीन सर्वे नंबर 291 स्टार फंक्शन हाॅल मध्ये अवैध वाळू साठा जप्त करून लिलाव दिनांक 24/0 6/2021 रोजी कागदोपत्री करण्यात आले होते लिलाव रक्कम 70470 रुपये आज पर्यंत रियाज महेमुद खान यांच्याकडून लिलाव रक्कम वसूल न करता त्या वाळू माफिया कडून आर्थिक देवाण-घेवाण करून व संगणमत करून तहसीलदार गणेश जाधव यांनी अवैध वाळू माफिया सोबत हात मिळवणी केल्याचे या प्रकरणा वरुन दिसून येत होते त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांना तक्रार देऊन जातीने लक्ष घालून दोषी निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांची चौकशी करून संदर्भीय पत्रा प्रमाणे त्या रकमेची वसुली करण्याची मागणी करण्यात आली होती त्या तक्रारीची दखल घेऊन याप्रकरणी तलाठी प्रविण चंद्रकांत कस्तुरे यांच्या फिर्यादीवरून रियाज महेमुदखान यांच्या विरोधात भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.