औसा येथे सिटी ब्लड स्टोरेज सेंटर ची स्थापना


 आपण पाहत आहोत  रिपोर्टर न्यूज़ आज ची बातमी मुख़्तार मणियार यांच्या कडून 

औसा येथे सिटी ब्लड स्टोरेज सेंटर ची स्थापना

आता औसा वासियांना लातुरला जायची गरज नाही

औसा सिटी हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर ची सुरुवात औसा येथील कसबे हॉस्पिटलच्या बाजूस याकतपूर रोड येथे करण्यात आली. त्यामध्ये एफपी,पीसीव्ही,होल ब्लड ची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून हॉस्पिटल मधून फोन येताच त्यांक्षणी आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटचे ब्लड सॅम्पल कलेक्ट करून ब्लड स्टोरेज मध्ये घेऊन येतो. व त्यावरील प्रोसिजर करून बॅग हॉस्पिटल मधील पेशंटला नेऊन देतो आणि जे रक्त बॅग आमच्याकडे नसेल ती बॅग ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ब्लड बँके मधून आणून देण्याची व्यवस्था करीत आहोत .

औसा येथे सिटी हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर टाकण्याचा उद्देश असा होता. हॉस्पिटल मध्ये एके दिवशी इमर्जन्सी पेशंट आला होता. तो अक्सिडेंट चा पेशंट होता. तिचा अक्सिडेंट मुळे रक्त भरपूर वाया गेल्याने औशात कुठेच ब्लड स्टोरेज ची सुविधा नसल्याने तो पेशंट दगावला.त्यावेळी मी विचार केला. औशात ब्लड स्टोरेज सेंटर चालू करण्याचा निर्णय घेतला.आणि मी औश्यातील डॉक्टरांना भेटलो आणि मला सगळ्या डॉक्टरांनी सहकार्य केले. आज मला ब्लड स्टोरेज सेंटर चालु करून दहा दिवस झाले. आणि आज माझ्या ब्लड स्टोरेज सेंटर मधुन दररोज एक दोन बॅग जात आहेत.असे सिटी हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर चे मालक ज्ञानेश्वर लक्ष्मण खोजे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या