निलंगा पोलीस ठाणे हद्दीत सापडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा उलगडा,:: आरोपींना अटक पोलीस स्टेशन निलंगा च्या पोलिसांची उत्तुंग कामगिरी.

 निलंगा पोलीस ठाणे हद्दीत सापडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा उलगडा,:: आरोपींना अटक पोलीस स्टेशन निलंगा च्या पोलिसांची उत्तुंग कामगिरी.*





                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 30/05/2022 रोजी मौजे पानचिंचोली येथे लातूर ते जहीराबाद मार्गावर रोडच्या बाजूला नालीमध्ये एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत आढळून आले होते. त्यावरून पोलीस ठाणे निलंगा येथे आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलीस ठाणे निलंगा चे पोलीस निरीक्षक  शेजाळ हे स्टॉफ सह घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली व मयताचे फोटो काढून शोध पत्रिका तयार करण्यात आली. सदर वर्णनाच्या इसमा बाबत मिसिंग दाखल असले बाबत इतर पोलीस ठाण्याकडून माहिती घेण्यात आली परंतु उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती. मरणाचे नक्की कारण समजून येण्यासाठी प्रेताचे पोस्टमार्टम करण्यात आले .

               सदरचे प्रेत हे कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ग्राम प्रशासनाच्या मार्फतीने पानचिंचोली येथे दफन विधी करण्यात आला.सदरच्या अनोळखी महत्त्वाची ओळख पटवून त्याच्या मृत्यूचे कारणाचा शोध घेण्याचे पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी मार्गदर्शन करून आदेशित केले होते. त्यावरून अपर पोलिस अधीक्षक श्री. अनुराग जैन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. श्री.दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे निलंगा चे पोलीस निरीक्षक श्री. बाळकृष्ण शेजाळ यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे निलंगा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.



                  सदरच्या पथकातील पोलीस अधिकारी अमलदार हे माहितीचे संकलन करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, सदर मयत व्यक्तीच्या वर्णनाचा इसम पंढरपूर येथून बेपत्ता आहे. बेपत्ता व्यक्तीचा वर्णन व प्रेताचे वर्णन हे तंतोतंत जुळत असून सदर मयताचे नाव भानुदास जगन्नाथ माळी, वय 60 वर्ष ,राहणार सुपली ता. पंढरपूर जि. सोलापूर असे असले बाबत त्याचे नातेवाईकाकडून माहिती मिळाली. 

            तपासादरम्यान पंढरपूर येथील तपास पथकाशी संपर्क करून तसेच मयताची गोपनीय व इतर भौतिक माहिती प्राप्त करून त्याचे विश्लेषण केले असता मयत नामे भानुदास जगन्नाथ माळी हे एका महिला व पुरुषाच्या त्यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून तपास पथक व पोलीस निरीक्षक शेजाळ, इनामवाडी तालुका निलंगा येथे जाऊन संशयित इसम नामे



 1)अमरनाथ अशोकराव किने, वय 21 वर्ष, रा इनामवाडी यास ताब्यात घेऊन

यांचेकडे कसून चौकशी केली असता त्याने पंढरपूर येथील एका महिलाच्या सहाय्याने भानुदास माळी यास पंढरपूर येथून सोबत घेऊन पानचिंचोली रोडवर गाडीमध्ये गळा आवळून खून केल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसाच्या तपास पथकाने सदर महिलेला ताब्यात घेऊन चौकशी कामी निलंगा येथे आणले चौकशी दरम्यान तिने तिचा मित्र अमरनाथ किने याचे सहाय्याने भानुदास माळी याचे सोबत असलेल्या पैशाच्या व्यवहारावरून व त्याचे सोबत असलेल्या अनैतिक संबंधा वरून खून केल्याचे सांगितले. 

             सदर प्रकरणात मयत व्यक्तीच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन निलंगा येथे गु र नं 150/22 क.302, 201,34 भा द वि प्रमाणे दाखल केले असून गुन्ह्यात वर नमूद आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ हे करीत आहेत.

         सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक श्री पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन,उपविभागीय पोलिस अधिकारी कोल्हे  यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक गोविंद राठो राठोड प्रताप गर्जे, पोलीस अमलदार विजयकुमार बिराजदार, शिंदे सुधीर ,निकमसिंग चव्हाण ,सुनील पाटील किशोर सूर्यवंशी, नितीन मजगे ,बळीराम मस्के ,बाबासाहेब जगताप महिला पोलीस अमलदार उषा साळुंखे,सुरेखा गरगट्टे, सरस्वती येलगटे यांनी केली आहे.

                 या प्रकरणात सोलापूर ग्रामीण येथील अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमतराव जाधव त्याचबरोबर पंढरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय जाधव आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांनी लातूर पोलिसांना मदत केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या