खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला व पोलिसांच्या रखवालीतून पळून गेलेल्या मुख्य आरोपीस आश्रय देणारा व वेळोवेळी मदत करणारा इसम ताब्यात.*

 खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला व पोलिसांच्या रखवालीतून पळून गेलेल्या मुख्य आरोपीस आश्रय देणारा व वेळोवेळी मदत करणारा इसम ताब्यात.*


कुख्यात गुंड सराईत गुन्हेगार नारायण इरबतनवाड यास आश्रय देणाऱ्यासह मुद्देमाल जप्त

औराद शहाजनी येथील प्राचार्य पोलिसांच्या ताब्यात


 


लातूर /प्रतिनिधी : - लातुरात ज्या आरोपीवर पोलिसांनी गोळीबार केला त्या आरोपीला शिक्षा दिल्याप्रकरणी लातूर स्थानिक गुन्हे शाखेने औराद शहाजनी येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यास ताब्यात घेतले आहे. अजितसिंह रघुवीरसिंह गहिरवार असे या प्राचार्याचे नाव असून सध्या त्याला चाकूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या घटनेस पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे.


 या बाबत थोडक्यात माहिती अशी की, खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला व पोलिसांच्या रखवालीतून पळून गेलेल्या मुख्य आरोपीस आश्रय देणारा व वेळोवेळी मदत करणारा इसम ताब्यात घेण्यात आले आहे. 

पोलीस ठाणे चाकूर येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/2022 कलम 302,120 (ब), 34 भादवी मधील खुनाच्या गुन्ह्यातील तसेच पोलीस ठाणे चाकुर गुन्हा रजिस्टर क्रमांक 99/2022 कलम 224 भा द वि मधील कुख्यात गुंड, सराईत गुन्हेगार, 

फरार आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड हा नमूद गुन्ह्यात मुख्य आरोपी असून गुन्ह्यातील इतर यापूर्वीच आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु नारायण हा गुन्हा घडल्यापासून फरार होता, व सतत राहण्याचे ठिकाण बदलत होता, त्यास अटक करण्यासाठी लातूर पोलिसांचे विविध पथके तयार करून त्याचा शोध घेण्यात येत होता. 

      कुख्यात गुंड सराईत गुन्हेगार नारायण इरबतनवाड हा आरोपी गुन्हा घडल्यापासून  वेळोवेळी राहण्याचे ठिकाणे बदलत होता. तो फरार असलेल्या कालावधीमध्ये त्याचा मित्र व औराद शहाजानी येथे प्राचार्य म्हणून नोकरी असलेला अहमदपूर येथे राहणारा इसम नामे अजितसिंह रघुविरसिंह गहेरवार हा नमूद फरार आरोपीस आपल्या घरी थांबून ठेवले होते. तसेच स्वतःची कार वापरण्यास देऊन फरार आरोपीची सर्व प्रकारची सोय करीत होता. अशी  गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून इसम नामे अजितसिंह रघुविरसिंह गहेरवार, (वय 45 वर्षे ,व्यवसाय नोकरी (प्राचार्य), रा. कुंमठा ता. अहमदपूर), सध्या राहणार शेळगी रोड ,औराद शहाजनी येथून दि. 3 जून 2022 रोजी औराद शहाजानी  येथून ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडून एक एअर पिस्टल,130 छर्रे , बारूद तसेच फरार आरोपीस ये - जा करण्यासाठी, फिरण्यासाठी दिलेली स्वतःची कार असा एकूण 8 लाख 15 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

 सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन सहाय्यक पोलीस अधीक्षक चाकुर श्रीनिकेतन कदम, यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील द्रोणाचार्य सहाय्यक फौजदार संजू भोसले, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, विनोद चिलमे ,राजेश कंचे, प्रमोद तरडे यांनी पार पाडली. या संदर्भाने पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते हे करीत आहेत



 लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

   या बाबत थोडक्यात माहिती अशी की पोलीस ठाणे चाकूर येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/2022 कलम 302,120 (ब), 34 भादवी मधील खुनाच्या गुन्ह्यातील तसेच पोलीस ठाणे चाकुर गुन्हा रजिस्टर क्रमांक 99/2022 कलम 224 भा द वि मधील फरार आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड हा नमूद गुन्ह्यात मुख्य आरोपी असून गुन्ह्यातील इतर यापूर्वीच आरोपींना अटक करण्यात आली होती परंतु नारायण हा गुन्हा घडल्यापासून फरार होता व सतत राहण्याचे ठिकाण बदलत होता त्यास अटक करण्यासाठी लातूर पोलिसांचे विविध पथके तयार करून त्याचा शोध घेण्यात येत होता. 

           


 

                  नमूद आरोपी गुन्हा घडल्यापासून  वेळोवेळी राहण्याचे ठिकाणे बदलत होता. तो फरार असलेल्या कालावधीमध्ये त्याचा मित्र व औराद शहाजानी येथे प्राचार्य म्हणून नोकरी असलेला अहमदपूर येथे राहणारा इसम नामे अजितसिंह रघुविरसिंह गहेरवार हा नमूद फरार आरोपीस आपल्या घरी थांबून ठेवले होते. तसेच स्वतःची कार वापरण्यास देऊन फरार आरोपीची सर्व प्रकारची सोय करीत होता. अशी  गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून इसम नामे

1) अजितसिंह रघुविरसिंह गहेरवार, वय 45 वर्ष ,व्यवसाय नोकरी (प्राचार्य), राहणार कुंमठा तालुका अहमदपूर, सध्या राहणार शेळगी रोड ,औराद शहाजानी

आज यास आज दिनांक 03/06/ 2022 रोजी औराद शहाजानी  येथून ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडून एक एअर पिस्टल ,130 छर्रे , बारूद तसेच फरार आरोपीस ये- जा करण्यासाठी, फिरण्यासाठी दिलेली स्वतःची कार असा एकूण 8 लाख 15 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.



               सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन सहाय्यक पोलीस अधीक्षक चाकुर श्रिनिकेतन कदम, यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील द्रोणाचार्य सहाय्यक फौजदार संजू भोसले, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, विनोद चिलमे ,राजेश कंचे, प्रमोद तरडे यांनी पार पाडली. या संदर्भाने पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते हे करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या