*"महाराणा प्रतापांचा जाज्वल्य इतिहास लिहिताना सेनापती हकीम खाॅ सूर यांना विसरता येणार नाही" - हाजी मतीन बागवान*
सोलापूर _ महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त सात रस्ता येथील पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराणा प्रतापसिंह यांनी आपल राज्य स्वतंत्र ठेवण्यासाठी फार मोठा त्याग केले होते. त्यांच्या जीवनातील हळदी घाटची लढाई ही फार महत्त्वाची होती या लढाईचे सेनापती हकीम खाॅ सूर होते. तत्कालीन मुघल साम्राज्यात महत्त्वाची पदे ही रजपूत सरदारांकडे होती जसे की मिर्झा राजे जयसिंह, दुर्गादास राठोड, जसवंतसिंह . तो सत्तासंघर्ष होता पण काही इतिहासकार धर्मसंघर्ष रंगवले असे मत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, पोपट भोसले, राजूभाई हुंडेकरी, जावेद बद्दी, बशीर अहमद सय्यद, तन्वीर गुलजार, मोहसीन शेख, तौफिक बागवान, ,मोहसीन नदाफ, मोहिन फुलारी, सोहेब बागवान, फुर्खान बाॅम्बे , अफवान बागवान, अरबाज चौधरी, अल्ताफ सातखेड, सुनील पवार, संजय राऊत या सह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.