झी मराठी टिव्ही वरील सत्यवान आणि सावित्री हा अंधश्रद्धा पसरवणारा कार्यक्रम दाखवू नये
अन्यथा भिम आर्मीचा दणका दाखवू
*भिम आर्मी मराठवाडा अध्यक्ष विनोद* *कोल्हे*
लातूर प्रतिनिधी :लक्ष्मण कांबळे
आज दि 12/जून/2022 पासून झी मराठी टीव्ही वरती सत्यवान, सावित्री, आणी यम हा कार्यक्रम चालू होणार असून या कार्यक्रमात यम हा सत्यवान याला मारून त्याचा प्राण घेऊन जात असताना सत्यवाणाची बायको सावित्री हि यमाकडून सत्यवानचे प्राण वापस आणून सत्यवणाला पुन्हा जिवंत करते अशी भाकडं, काल्पनिक अंधश्रद्धा पसरवनारी कथा दाखवून बहुजन समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचे काम झी टीव्ही करत आहे,असे विनोद कोल्हे म्हणाले. भिम आर्मी भारत एकता मिशन चा या कार्यक्रमाला विरोध आहे, तुम्हाला सावित्री दाखवायची असेल तर माता सावित्री फुले दाखवा, ज्या सावित्रीने अंधश्रद्धा विरोध रान पेटवून स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून दिले, माता सावित्री मुळे आज देशातील महिला, राष्ट्रपती झाली, मुख्यमंत्री झाली, IAS, IPS अधिकारी झाली, तेव्हा झी टीव्ही ने माता सावित्री दाखवावी, या देशाची खरी स्त्री उद्धारक माता सावित्री आहे माता सावित्री दाखवली तर देशातील महिलांचा माता सावित्री च्या उपकाराची जाण होईल आपल्या माध्यमातून होईल, सत्यवान सावित्री दाखवली तर अंधश्रद्धा पसरवण्याकचे काम होईल तेव्हा काल्पनिक सावित्री दाखवण्यापेक्षा, आम्हांला माता सावित्री दाखवा असे भिम आर्मीचे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.