डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर
लातूर: ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी राज्य पातळीवरील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेची लातूर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी के.वाय.पटवेकर, उपाध्यक्षपदी हमीदभाई शेख तर सचिवपदी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ कुलकर्णी यांची निवड झाली असून यांच्या निवडीने डिजिटल मीडिया मधील पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. के.वाय.पटवेकर, हामिदभाई शेख व गोपाळ कुलकर्णी दोन युवा पत्रकारासोबत एक ज्येष्ठ पत्रकार यांच्या अनुभवाने व संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पत्रकारांना येणाऱ्या अडचणीची त्यांना जाण असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. लातूर जिल्हा कार्यकारणी के.वाय.पटवेकर(अध्यक्ष), हमिदभाई शेख(उपाध्यक्ष), गोपाळ कुलकर्णी(सचिव), नितीन भाले(सहसचिव), बालाजी उबाळे(कोषाध्यक्ष), Adv. अनवरखान पठाण(कायदेविषयक मार्गदर्शक), आहिल्या कस्पटे(महिला प्रतिनिधि), इरफान शेख(सदस्य), बी.जी.शेख, शिवाजी कांबळे, नीलकंठेश्वर चव्हाण, दिनकर मद्देवार, नितीन चालक, सलीम तांबोळी, संजय बच्चे, सुधाकर नाईक यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल संघटनेचे ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर, दीपरत्न निलंगेकर सह माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, योगेश कर्वा, सतिश जाधव, प्रफुल्ल गिरी, योगीराज हल्लाळे, जेष्ठ पत्रकार राजीव कुळकर्णी(ठाणे), चंद्रकांत पाटील, इसाक मोमीन, प्राध्यापक डॉ. फारूक तांबोळी, सुरेंद्र धुमाळ, शेख जावेद, रवी पाटील, लक्ष्मण काळे, अमोल इंगळे, व्यंकट पन्हाळे, बाळ होळीकर, मोहसीन खान पठाण, प्रतिमा कांबळे, राणी भालेराव, गणेश मदने, सलीमभाई पठाण रामलिंग दत्तापुरे, असदुलाखान पठाण, अरुणकुमार मेहत्रे आदीने अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.