स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. देशीदारू व वाहनासह 4 लाख 7 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.*


   स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. देशीदारू व वाहनासह 4 लाख 7 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त





लातूर प्रतिनिधी 

                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर दारू विकणारे यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगानेजिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम सुरु आहे.

           पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, निलंगा डॉ. दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही करण्याकरिता विविध पथके तयार करण्यात आले होते.

दिनांक 24/12/2022 रोजी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस ठाणे देवणी हद्दीत विनापरवाना देशीदारूची अवैध विक्री/व्यवसाय करण्यासाठी वलांडी शिवारातून टाटा सुमो वाहना मधून देशीदारूची वाहतूक होत असताना  सदर पथकाने सापळा लावून छापा मारला असता तेथे देशीदारूचे 1536 बाटल्या किंमती-1,07,520/- रूपयेची बेकायदेशररित्या देशी दारू आणि एक टाटा सुमो वाहन  असा एकूण 4,07,520/- रुपयेचा  देशीदारूचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या वाहतूक करीत असताना मिळून आला असून सदर प्रकरणी आज रोजी इसम नामे


 1) पांडुरंग शिवाजी बिराजदार, वय 40 वर्ष ,राहणार इस्लामवाडी, तालुका देवनी जिल्हा लातूर


                 याचे विरुद्ध पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 305/2022, कलम 65(अ)(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास देवणी पोलीस करत आहेत.

             सदरची कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे  यांचे नेतृत्वात , पोलीस अंमलदार सचिन मुंडे ,बालाजी जाधव, रवि कानगुले यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या