जैन मंदिर औसा येथे मानस्तंभ मूर्ती प्रतिष्ठापना महोत्सव - विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
औसा प्रतिनिधी:- येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नव्याने उभारण्यात आलेल्या 31 फूट उंचीच्या मानस्तंभामध्ये मूलनायक भगवान अजितनाथ यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता विधिवत करण्यात येणार आहे. हा महोत्सव 26 व 27 डिसेंबर दोन दिवस चालणार असून ,यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी मंदिरात ध्वजारोहण होईल व दुपारी एक वाजता औसा शहरातून मूर्तीची भव्य मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत कोल्हापूर येथील जैन झांजपथक व महिलांचे टिपरी नृत्य यांचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. तसेच कलश कुंभासह महिलांचा सहभाग आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता यागमंडल विधान पूजा होऊन (मांगीतुंगी)जिल्हा नाशिक येथील प्रतिष्ठाचार्य पंडित शैलेश जैन यांच्या अधिपत्याखाली मूर्तीची विधिवत प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. याप्रसंगी औसा नाथ संस्थांचे पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर व पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची उपस्थिती राहणार आहे .तरी याप्रसंगी सर्व जैन समाज बांधवांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन औसा दिगंबर जैन मंदिर समितीने केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.