*पोलीस ठाणे लातूर ग्रामीण हद्दीतील खुनाच्या गुन्हयातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक*
लातूर रिपोर्टर न्यूज़
दिनांक 19/12/2022 ते 20/12/2022 दरम्यान वासनगाव शिवारात आरोपी मदन उर्फ मनोज कदम याने म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेचा दगडाने मारून खून केला होता.
त्यावरून नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 271/2022 कलम 302, 201 भादवी तसेच (2)(V) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून सदरचा आरोपी फरार होता.
आरोपीचे शोध कामी पोलीस अधिक्षक श्री. सोमय मुंडे ,अपर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गणेश कदम व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली खुनातील फरार आरोपी शोध कामी वेगवगळे पथके तसेच स्थागुशा येथील पोलीस अधिकारी व अमलदारांचे विशेष पथक आरोपी शोधकामी विविध ठिकाणी पाठविण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्या करिता पथकांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करत होते. सदर पथके आरोपीचे शोध कामी वेगवेगळया भागात रवाना केले. त्या दरम्यान दि.22/12/2022 रोजी आरोपी मदन लालासाहेब कदम हा औसा ते निलंगा जाणारे रोडवरील करजगावपाटी परिसरात फिरत असल्याची गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली.
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फरार आरोपी मदन उर्फ मनोज कदम यास खुनाच्या गुन्हयात ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे लातूर ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम करून आरोपी वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणाची अतिशय कुशलतेने माहिती मिळवून आरोपीस अटक केली. आहे सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, नवनाथ हासबे, राजेश कंचे, तुराब पठाण चालक चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.