आविष्कार संशोधन महोत्सवात कॉक्सिटची फिरदोस शेख तृतीय

 

आविष्कार संशोधन महोत्सवात

कॉक्सिटची फिरदोस शेख तृतीय





 लातूर, दि.२४- येथील दयानंद महाविद्यालयात झालेल्या आविष्कार २०२२ - २३ या संशोधन महोत्सवात कॉक्सिट महाविद्यालयाची विद्यार्थिनी फिरदोस शेख हिने सादर केलेल्या प्रयोगाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तिची आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या हस्ते तिचे कौतुक करण्यात आले.

  येथील कॉक्सिट महाविद्यालयात एम. एस्सी. बी. टी. प्रथम वर्षात फिरदोस शेख ही विद्यार्थिनी शिक्षण घेते. जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत तिने सादर केलेल्या संशोधन प्रयोगाला पारितोषिक मिळाले होते. आता येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या आविष्कार २०२२ - २३ संशोधन महोत्सवात तिने सादर केलेल्या बीट व नारळापासून तयार केलेल्या बर्फीच्या प्रयोगासाठी तिला तृतीय पोरितोषिक प्राप्त झाले आहे.

  याबद्दल महाविद्यालयात संस्थाध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या हस्ते तिचे कौतुक करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, समन्वयक एल. एम. पाटील, डॉ. डी. एच. महामुनी, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख ईश्‍वर पाटील, शारदा सेमी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या