गुळखेड्यांचे लोकनियुक्त सरपंच यांचा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व आ. धिरज देशमुख यांच्या हस्ते सत्कार.....
लातुर जिल्ह्यातील ५८ गावातील विजयी सरपंच आणि ७५ गावातील काँग्रेस विचारांचे ५५२ विजयी सदस्यांचा भव्य सत्कार संपन्न
औसा प्रतिनिधी
लातूर येथील सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून या सत्कार सोहळ्यास सर्व लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीशैल्य उटगे जिल्हाध्यक्ष काॅग्रेस पक्ष यांच्या वतीने करण्यात आले होते. हा भव्य सत्कार सोहळा माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी औसा तालुक्यातील गुळखेडा येथील नुतन ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच भास्कर यादव,चेअरमन सचिन गिराम, माजी सरपंच पती बबन चेंडके, महालिंग गिराम,अरविंद भोसले,पत्रकार पांचाळ विठ्ठल, मोहन बेले,अंनिस बिडकर,सुभाष गाडेकर,सुभाष सिरसले,पृथ्वीराज गोरे,हणमंत पौळकर,अमोल चेंडके,बालाजी गिराम,राजकुमार कांबळे,अंबादास रोंगे,राजेंद्र रोंगे, यांच्यासह लातूर ग्रामीण व शहर मतदारसंघातील नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा "सत्कार समारंभ" श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय,खाडगाव रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आला.यावेळी मा.आ. वैजनाथ शिंदे मा.आ. त्र्यंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, यशवंतराव पाटील , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, जागृति शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, ट्वेंटी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे रेणा चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुलगे, लातूर काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड किरण जाधव औसा तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य नारायणराव लोखंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते
कार्यक्रमास लातूर जिल्हा काँग्रेसचे विविध सेल चे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील सुरेश चव्हाण, हरिराम कुलकर्णी प्रवीण सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी,जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ राजकुमार पाटील संचालक अनुप शेळके संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, रेणापूर,लातूर, औसा येथील नूतन सरपंच सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
--------------------------------
लोकनियुक्त सरपंच यांचा विजय ही विकास कामाची पावती*
जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची माहिती
लातूर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे सरपंच सदस्य मोठया प्रमाणावर निवडून आले लोकनेते विलासराव देशमुख माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या कार्याची पावती असून आगामी काळातही काँग्रेसच्या विचाराने विकासाच्या विचारांच्या जोरावर आम्ही निवडणुका जिंकू असा विश्वास श्रीशैल्य उटगे यांनी व्यक्त केला
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.