जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाच्या विशेष शाळेतील दिव्यांग यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन संपन्न.


*जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाच्या विशेष शाळेतील दिव्यांग यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन संपन्न.*









उस्मानाबादः- समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या विद्यमाने दिव्यांगाच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे तुळजाभवानी स्टेडियम येथे श्री शिंदे साहेब अपर जिल्हाधिकारी उस्मानाबाद श्रीमती पी पी शिंदे प्रकल्प संचालक जि ग्रा वि यंत्रणा उस्मानाबाद मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री केंद्रे साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी श्री श्रीकांत हरनाळे क्रीडा अधिकारी श्री लटके साहेब तसेच रोटरी क्लब ऑफ उस्मानाबादचे सदस्य श्री कदम यांच्या हस्ते हेलन क्लिअर लुई ब्रेल छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून झेंडा फडकून व रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी श्री केंद्रे साहेब यांनी खेळाचे महत्व सांगितले खेळामुळे तन मन शुद्ध राहते शरीर निरोगी राहते आणि सर्व दिवंगांना शुभेच्छा दिल्या तसेच श्रीमती पी पी शिंदे मॅडम यांनी पण दिव्यांग खेळाडूंना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री नागनाथ चौगुले साहेब जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केले प्रास्ताविकांमध्ये उस्मानाबाद दिव्यांग शाळेतील 26 शाळांनी सहभाग घेतला आहे यामध्ये 600 विद्यार्थी खेळाडू आहेत व 13 क्रीडा प्रकार आहेत यामध्ये मूकबधिर अंध अस्तिव्यांग व अंधप्रवर्ग आहेत यामधून प्रथम आलेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये संधी मिळणार आहेत दोन दिवस या स्पर्धेत चालणार आहेत यामध्ये खेळाडूंना दोन वेळेचे जेवण नाश्ता तसेच पारितोषिक व प्रमाणपत्र असे देण्यात येणार आहे असे सांगितले

कार्यक्रमांमध्ये दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी श्री काशीराम शिंदे प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार

निर्मूलन समिती दिव्यांग विभाग श्री रसूल सय्यद जिल्हाध्यक्ष श्री बादशहा पटेल बीड जिल्हाध्यक्ष व दिव्यांग शाळेचे

संस्थापक अध्यक्ष श्री शहाजी चव्हाण श्री बालाजी शिंदे श्री सचिन सरवदे श्री रफिक कोतवाल श्री प्रताप धायगुडे श्री चंद्रकांत

जाधव यांचे स्वागत व सत्कार श्री नागनाथ चौगुले जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद श्री भारत कांबळे

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता व श्री सुभाष शिंदे सहाय्यक सल्लागार यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात अस्थिविंग प्रवर्गातून 8 ते 12 मुले 50 मीटर धावणे या स्पर्धेचे श्री शिंदे साहेब अपार जिल्हाधिकारी उस्मानाबाद श्रीमती पी पी शिंदे प्रकल्प संचालक जि ग्रा वि यंत्रणा उस्मानाबाद मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री केंद्रे साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनळे क्रीडा अधिकारी श्री लटके साहेब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धा सुरू करण्यात आली तसेच रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद सदस्य श्री कदम साहेब यांनी दिव्यांगांना स्वच्छतेचे महत्व समजून दिले व हात धुण्याचे प्रशिक्षण करून दाखवले व हँडवॉश ही मोफत दिले कार्यक्रमाचे जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समाज कल्याण विभागातील कर्मचारी अधि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री श्रीमती देव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या