जिल्हास्तरीय शैक्षणिक/सामाजिक प्रबोधन शिबीर (इजतेमा) साठी जिल्हयातील शिक्षकांना दोन दिवसांची सुट्टी.
लातूर (प्रतिनिधी)औसा येथे होत असलेल्या जिल्हास्तरीय शैक्षणिक /सामाजिक प्रबोधन शिबीर (इजतेमा ) साठी जिल्हयातील शिक्षकांना दोन दिवसांची सुट्टी देणे बाबत मा.आ.श्री विक्रम वसंतराव काळे,औरंगाबाद विभाग,शिक्षक मतदार संघ, प्रांताध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांचे संदर्भीय पत्रानुसार लातूर जिल्हयामधील औसा येथे दि.05 व 06 डिसेंबर 2022 रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय शैक्षणिक सामाजिक प्रबोधन शिबीर ( इजतेमा ) आयोजित करण्यात आला असून सदरील शिबीरासाठी जिल्हयातील शिक्षक, विद्यार्थी यांना बौध्दिक, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने जिल्हयातील सर्व उर्दू
शिक्षक बंधु व विद्यार्थ्यांना उपस्थित राहता यावे यासाठी जिल्हाभरामध्ये दोन दिवस सुट्टी देणेबाबत व नंतर 4 शनिवार पुर्णवेळ शाळा भरवून सुट्टया भरुन काढणेसाठी मुख्याध्यापकांना सूचित करणेसाठी कळविण्यात आले आहे.दि.05 व 06 डिसेंबर 2022 रोजी दोन दिवसांची सुट्टी घेणेसाठी खाजगी शाळेतील मुख्याध्यापक यांनी शैक्षणिक वर्षातील त्यांच्या अधिकारात असलेल्या तीन सुट्टयापैकी दोन सुट्टया घ्याव्या.तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक यांनी सदरील दिवशी सुट्टी घेणसाठी पुढील चार शनिवार पूर्ण वेळ यांच्याकडे सादर करुनच सुट्टी घेण्यात यावी.शाळा भरविण्यात येईल अशा आशयाचा शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करून सुट्टी घेण्यात यावी असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.पत्रावर वंदना फुटाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक व नागेश मापारी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद,लातूर यांच्या स्वाक्षरी ने सर्व मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.