आरोग्यदायी जीवनासाठी औसा तालुका योगमय करा .....कलावती भातंब्रे
औसा प्रतिनिधी पतंजली योगपीठ हरिद्वार च्या माध्यमातून योगगुरु रामदेव बाबा यांनी प्राणायाम, योगासन व ध्यान धारणेच्या माध्यमातून तसेच आपल्या दैनंदिन सकस आहाराच्या माध्यमातून आपले आरोग्य रक्षण करण्यासाठी योगाची देणगी दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा योगाला अत्यंत महत्त्व दिले म्हणून आज भारत योगाच्या क्षेत्रामध्ये विश्वगुरू बनत असल्याने आता प्रत्येक कुटुंबाने आपल्या संपूर्ण कुटुंबाला आरोग्यदायी करण्यासाठी औसा तालुका योगमय करावा असे आवाहन सौ कलावती भातंब्रे यांनी केले. औसा येथील श्री मुक्तेश्वर विद्यालय मध्ये आयोजित पतंजली योग समितीच्या महिला कार्यकारणी निवड कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ मीनाताई स्वामी होत्या यावेळी तारामती पांडे यांची उपस्थिती होती. पतंजली महिला योग समितीच्या औसा तहसील प्रभारी पदी सौ छायाताई शेवाळे, संघटन मंत्री दीपमाला चव्हाण, युवती प्रभारी लक्ष्मी मोरे, महामंत्री कोमल सावळकर, शहराध्यक्ष वैशाली लोकरे, कोषाध्यक्ष शुभांगी महामुनी, सहभागी रेखा गवळी यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सौ मीनाताई स्वामी ,तारामती पांडे ,नेताजी सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले. पतंजली महिला योग समितीच्या माध्यमातून आपणावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे। पार पडण्याचा संकल्प पतंजली योग समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर केला. कार्यक्रमासाठी औसा शहरातील असंख्य महिला उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.