विद्यार्थ्यांनी ऐकल्या गणिताच्या गमतीजमती बौद्धिक सत्रात रमले विद्यार्थी

 


विद्यार्थ्यांनी ऐकल्या 
गणिताच्या गमतीजमती 

बौद्धिक सत्रात रमले विद्यार्थी





 

   लातूर/प्रतिनिधी:भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई,भारत भारती,क्रीडा भारती,विद्याभारती,  एज्युकेशनल रिसर्च असेम्ब्ली, पुणे,शिक्षण विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्र चेतना शिबिरातील विविध सत्रांत विद्यार्थी रममाण झाले.या सत्रात राजीव तांबे यांनी विद्यार्थ्यांना पॉझिटिव डायमेन्शन या विषयावर मार्गदर्शन करत
बालवयातील गणिताच्या गमतीजमती सांगितल्या.
   आत्मविश्वास कसा वाढवावा याबद्दल तांबे यांनी मार्गदर्शन केले.जो रिस्क घेतो तोच पुढे जातो.चुका झाल्या तरी त्यातून चांगला धडा घ्यावा.आपल्या मनाला वेगळ्या प्रकारच्या विचारांचे वळण लावणे व त्यातून नवीन शिकणे जो शिकतो तोच जिंकतो,असे मत त्यांनी व्यक्त केले.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना येथील केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सौ.शुभदा देशमुख यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचा परिचय,स्वागत, सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्रीमती रिता सहस्त्रबुद्धे यांनी केले.जान्हवी देशपांडे यांच्या कल्याणमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
     याचवेळी चित्ररंग या दुसऱ्या सत्रात भागामध्ये माधव जोशी  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी भारतीय चित्रकारांची ओळख करून दिली.राजा रविवर्मा,साबानंद मनप्पा पंडित, वासुदेव कामत,अमृता शेरगील, बाबुराव पेंटर या सुप्रसिद्ध चित्रकारांची माहिती त्यांनी दिली.
कलर मिडियाची  माहिती सांगितली.जलरंग,पोस्टल कलर, अॕक्रीलिक कलर अशा विविध रंगांची माहिती सांगितली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेंकटेश माने यांनी केले.सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अनुराधा कुलकर्णी यांनी केले.
  पालकांसाठी आयोजित मेळाव्यात संबोधित करताना राजीव तांबे यांनी अनुभवातून कृतिशील शिक्षण द्यावे,असे मत मांडले.मुलांनी परावलंबी बनू नये म्हणून पालकांनी त्यांच्या आवडीच्या गोष्टी कराव्यात.शिस्त लावावी,संस्कार व स्वावलंबनाचे संस्कार द्यावे,असे ते म्हणाले.या
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून  शिरीष पोफळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव हेंडगे यांनी केले.वैयक्तिक पद्य संतोष बीडकर यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार श्रीमती संपदा देशपांडे यांनी मानले.
    राष्ट्र चेतना सप्ताह व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उद्घाटन गुरुनाथ झुंजारे (शिबिर प्रमुख),शिवाजी हेंडगे (मुख्याध्यापक),नळगे ताई (ज्येष्ठ शिक्षिका),व्यंकटेश माने,माधव जोशी( चित्रकला शिक्षक),सौ. मनीषा लामजणे,सौ.कविता मोरे, सौ.देशना ताई ,सौ.विद्याताई थळकरी,सौ पूजा कांबळे,तपसे ताई याप्रसंगी उपस्थित होत्या. यात एकूण १०१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
 हार्टफुलनेस या संस्थेचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी ध्यान कसे करावे हे विद्यार्थ्यांना सांगितले. जगण्यासाठी अन्नाची जशी गरज तशी फिट राहण्यासाठी योगाची व ध्यानाची गरज असते.एकाग्रता वाढवण्यासाठी,रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी ध्यान आवश्यक आहे.माणसाने वर्तमानात आयुष्य जगावे असे सांगत त्यांनी प्रात्यक्षिकातून ध्यानाचे महत्त्व सांगितले.या सत्राच्या अध्यक्षस्थानी श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाईचे उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी हे होते.
सूत्रसंचलन,प्रास्ताविक व आभार अनुराधा कुलकर्णी यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता ज्योती देशपांडे यांच्या कल्याणमंत्राने झाली.
 या कार्यक्रमास समन्वय समितीचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी तुंगीकर,शालेय समिती अध्यक्ष शैलेश कुलकर्णी,शिबिर संयोजक नितीन शेटे,
सहसंयोजक संजय गुरव, केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी,श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव हेंडगे,  रेनिसन्स सीबीएससी स्कूलच्या  प्रधानाचार्या श्रीमती अलिशा अग्रवाल, शिशुवाटिका प्रमुख 
श्रीमती मंजुषा ताई जोशी,शिबीर समन्वयक राहुल गायकवाड, शिबिर प्रमुख गुरुनाथ झुंजारे,
सहप्रमुख मुरलीधर गवळी ,सर  महाव्यवस्थापक जितेंद्र जोशी यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या