मराठवाडा विकास परिषदेसाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.22/12/2022
मराठवाडा व विदर्भाचा विकास गतीने व्हावा म्हणून मराठवाडा विकास परिषद स्थापन करण्यात आली होती. तरीही आज मराठवाड्याचा एकूण अनुशेष 1 लाख कोटी पर्यंत आहे. ज्यामध्ये शिक्षण, कृषी, ग्रामविकास, पायाभूत सुविधा व इतर योजनामध्ये आहे. यासाठी सन 2019-20 मध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या विकास परिषदेतून समोर आले आहे व त्याला सोडविण्याचा प्रयत्न काही प्रमाणात करण्यात आला. ज्यामध्ये मराठवाडा मेडीकल विद्यार्थी प्रवेशाच्या संख्येची विषमता दूर झाली व विविध योजनेवर काही निधी उपलब्ध झाला आहे. आज मराठवाड्याचे हक्काचे उजनी धरणातील 24 टी.एम.सी.पाणी, आर्थिक अनुशेषाची पूर्तता, केंद्र सरकारमार्फत राज्याला मिळालेल्या योजनेत मराठवाड्याचा समावेश राज्याने न करणे, मराठवाडा वाटरग्रिड योजना अंमलबजावणी व मराठवाडा विकास परिषदेला त्वरीत मान्यता अशा विविध विषयासाठी मराठवाड्यातील सर्व पक्षीय मा.खासदार, मा.आमदार, विविध विभागाचे अभ्यासक, वरीष्ठ अधिकारी, साहित्यीक वृत्त संपादक, प्रतिनिधी, अशा सर्व अभ्यासकांना घेवून फे्रबु्रवारी महिण्याच्या दुसर्या आठवड्यात मा.प्रमुखांना उपस्थित राहण्याचे विनंतीपत्र आपण दिलेले आहे. या कामी सर्वपक्षीय आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी इतर सर्वांचे सहकार्य घेवून मराठवाडा विकास परिषद गुणात्मकदृष्ट्या यशस्वी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून राहणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.