*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या लातूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी मुजम्मिल शेख यांची निवड*
लातूर(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या लातूर जिल्हा संपर्कप्रमुख युवा आघाडी पदी युवक तरुण ,तड़फदार,सामाजिक कामाची आवड असलेले मुजम्मिल शेख यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी जाहीर केली.
संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ताकद मजबूत होत असून सर्व समाज घटक राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात सामील होत आहेत.
मुज्जमिल शेख निवड झाल्याबरोबरच लवकरच पद्ग्रहन सोहळा व कार्यकर्ता मेळावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुज्जमिल यांचा जिल्ह्यात अत्यंत दांडगा जनसंपर्क असून मुज़म्मिल शेख यांचा स्वभाव मीत भाषी व सर्व समाज घटक यांना सोबत घेऊन काम करण्याचा आहे. यामुळे जिह्यात राष्ट्रिय रिपब्लिकन पक्षवाढीकरीता जिल्ह्यात ते प्रयत्न करणार आहेत
या निवडीने लातूर जिल्ह्यातील युवकांमध्ये आनंदाचे व उत्सहाचे वातावरण असून मुजम्मिल शेख यांच्या निवडी बद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.