श्रीराम फायनान्स सर्वात मोठी एनबीएफसी.
श्रीराम फायनान्सच्या कार्यालयात विलीनीकरणाचा जल्लोष!
लातूर (विशेष रिपोर्ट-अर्जुन कांबळे/इकबाल शेख)-श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड या दोन वित्तीय संस्थेचे विलनीकरण झाले असून आता श्रीराम फायनान्स लिमिटेड असे नामकरण करण्यात आले आहे.शिवाय ही संस्था भारतातील गैर बँकिंग क्षेत्रातील क्रमांक एकची संस्था बनली आहे.त्यामुळे लातूर शहरातील बार्शी रोडवरील श्रीराम फायनान्सच्या शाखेत सर्व विभागाचे व्यवस्थापक , कर्मचारी यांनी केक कापून व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिजनल बिजनेस हेड शिवाजी कुट्टे,असिस्टंट जनरल मॅनेजर संतोष पाटील,रिजनल मॅनेजर नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.ग्राहकांचे प्रतिनिधी म्हणून गातेगाव विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन विरसेन भोसले,सरस्वतीताई भुतडा तसेच सिनिअर मॅनेजर अजितसिंह दोडे,डिव्हिजनल मॅनेजर वैभव घाटे,गोल्ड लोन मॅनेजर महेश पेशकर,श्रीराम चिट्सचे मॅनेजर प्रविण पवार,सहायक व्यवस्थापक विजय देशमुख,अर्जुन कांबळे,वसुली विभागाचे विभागीय मॅनेजर बद्रीलाल पुंड,सुनील जाधव,कल्याण भिसे,बालाजी शिंदे,हनुमंत तेलंगे,अजय उगीले,लीगल मॅनेजर महेश शिंदे,नितीन स्वामी,संतोष मोरे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी श्रीराम फायनान्सच्या वाटचालींबद्दल व आगामी संकल्पाबद्दल विचार मांडले.श्रीराम फायनान्स लि.ही आता सर्वसामान्यांना पतपुरवठा करणारी देशातील सर्वात मोठी बिगर बँक वित्तसंस्था झाली आहे.श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स व श्रीराम सिटी युनियन फायनान्स यांचे एकत्रीकरण करण्यात आले.वैयक्तिक कर्ज,सोने तारण कर्ज,वाहन कर्ज, एस.एम.ई.कर्ज आदी कर्ज देणाऱ्या श्रीराम फायनान्सच्या ताब्यात सुमारे पावणेदोन लाख कोटींची मालमत्ता आहे.त्यांच्याकडे ३२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून संस्थेला एए प्लस रेटिंग मिळाले आहे.व्यापारी वाहने व दुचाकी खरेदीसाठी अर्थसाह्य देणारी श्रीराम फायनान्स ही सर्वात मोठी एनबीएफसी आहे. तिचे ६७ लाख ग्राहक असून एकूण ५७ हजार कर्मचाऱ्यांसह त्यांच्या ५२ टक्के शाखा या ग्रामीण विभागात आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीपीयू चे मॅनेजर विनायक बिडवे यांनी मांडले तर शेवटी सिद्धेश्वर स्वामी यांनी आपल्या मेमिक्रीतून श्रीराम फायनान्सचे महत्व विशद करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.